Black-Winged Kite Bird Information In Marathi काळ्या पंखाची घार ( कापशी घार ) या पक्षाचे पंख लांब असतात तसेच प्रमुख रंग हा राखाडी किंवा पांढरा असतो. या पक्षाच्या खांद्याचे ठिपके हे काळ्या रंगाचे असतात व पंखाचे टोक व डोळ्यांचे पट्टे सुद्धा काळे असतात. हे पक्षी मुख्यतः सहारा आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय आशिया प्रदेशातील मोकळ्या प्रदेशांमध्ये आढळून येतात तसेच हे पक्षी दक्षिण युरोपमध्ये व पश्चिम आशियामध्ये सुद्धा आढळून येतात.

कापशी घार पक्षाची संपूर्ण माहिती Black-Winged Kite Bird Information In Marathi
हा पक्षी भटक्या स्वरूपामध्ये फिरतात. हे पक्षी सामान्यता गवताळ प्रदेशात तसेच खोऱ्यातील झाडांमध्ये आढळून येतात. हे पक्षी ऑस्ट्रेलिया आफ्रिका युरोप इत्यादी देशांमध्ये सुद्धा आढळून येतात. हे पक्षी त्यांच्या आहारामध्ये लहान उंदीर सरपटणारे प्राणी कीटक व इतर अपृष्ठवंशीय प्राणी सुद्धा खातो. तसेच हे पक्षी त्यांच्या आहारामध्ये लहान साप पक्षी सुद्धा खातात.
पक्षाचे नाव | काळ्या पंखाची घार (कापशी घार) |
इंग्रजी नाव | Black wings kite |
कुळ | ऍसिपिट्रीडे |
शास्त्रीय नाव | एलॅनस कॅर्यूलस |
आयुष्य | 10 वर्ष |
रंग | राखाडी व पांढरा |
वजन | 260gm |
लांबी | 35cm |
कापशी घार हा पक्षी कुठे राहतो
कापशी घार हे पक्षी मुख्यतः सहारा आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय आशिया प्रदेशातील मोकळ्या प्रदेशांमध्ये तसेच भारतातील काही प्रदेशांमध्ये आढळून येतात तसेच हे पक्षी दक्षिण युरोपमध्ये व पश्चिम आशियामध्ये सुद्धा आढळून येतात. हा पक्षी भटक्या स्वरूपामध्ये फिरतात. हे पक्षी सामान्यता गवताळ प्रदेशात तसेच खोऱ्यातील झाडांमध्ये आढळून येतात. हे पक्षी ऑस्ट्रेलिया आफ्रिका युरोप इत्यादी देशांमध्ये सुद्धा आढळून येतात.
कापशी घार पक्षाचा आहार
कापशी घार हे पक्षी त्यांच्या आहारामध्ये लहान उंदीर सरपटणारे प्राणी कीटक व इतर अपृष्ठवंशीय प्राणी सुद्धा खातो. तसेच हे पक्षी त्यांच्या आहारामध्ये लहान साप पक्षी सुद्धा खातात.

कापशी घार या पक्षाचे वर्णन
कापशी घार या पक्षाची लांबी ही 35 cm पर्यंत असते तसेच या पक्षांच्या पंखांचा विस्तार हा 80 ते 100 cm पर्यंत असतो. या पक्षांमध्ये नराचे वजन 260 ग्रॅम पर्यंत असते. या पक्षांमध्ये नर व मादी यांचा पिसारा मात्र समान असतो. या पक्षांचे मुकुट मान आणि वरचा भाग हा राखाडी रंगाचा असतो तर डोके व खालचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो.
हा पक्षी जेव्हा उड्डाण करतो तेव्हा या पक्षाचे शेपटी ही चौकोनी दिसते तसेच त्यावर काळ्या रंगाची ठिपके दिसतात. या पक्षांच्या नाकपुड्या या पिवळ्या रंगाच्या असतात व चोच काळ्या रंगाचे असते तसेच पाय सुद्धा पिवळ्या रंगाचे असतात किंवा सोनेरी पिवळे असतात. या पक्षाच्या पायांना तीन बोटे व एक बोट पाठीमागे असते.
कापशी घार या पक्षाचा प्रजनन काळ
कापशी घार या पक्षांचा प्रजनन काळ हा एप्रिल ते मे हा कालावधी सोडून संपूर्ण वर्षभर या पक्षांचा प्रजनन काळ असतो. या काळामध्ये हे पक्षी घरटे तयार करतात व त्या घरट्यांमध्ये या पक्षाची मादी तीन ते चार अंडी घालते. या अंड्यांचा रंग हा फिकट गुलाबी असून त्यावर लाल रंगाची ठिपके असतात.
ही अंडी तीस दिवस उबवली जातात. हे अंडे नर व मादी दोघे मिळून उभवितात अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर पिल्लांना अन्न खाऊ घालण्याचे काम सुद्धा नर व मादी दोघे मिळून करतात. हे पक्षी पाण्यातील मासे सुद्धा पकडतात तसेच हवेतल्या हवेत लहान पक्षी पकडतात, पिल्लांना खाऊ घालतात.
घार पक्षाचे प्रकार
कापशी घार हे पक्षी दुर्मिळ पक्षी असून शिकारी पक्षी आहेत जे फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आढळून येतात या पक्षांची लांबी पस्तीस सेंटीमीटर पर्यंत असते तसेच हे पक्षी फिकट राखाडी व पांढऱ्या पिसाऱ्याचे असतात. या पक्षांचे डोळे हे लाल असून डोळ्यांचे वर्तुळ हे काळ्या रंगाचे असते.
या पक्षाचे पंख उडताना M या इंग्रजी अक्षराप्रमाणे दिसतात. त्यामुळे या पक्षांना अक्षर पंख असलेले पतंग असे म्हटले जाते. या पक्षांना सुद्धा इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्व्हर्सेशन ऑफ नेचरने धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये टाकले आहे. त्यामुळे या पक्षांच्या वाढीसाठी विविध योजना राबवण्यात येतात.
निष्कर्ष
कापशी घार हा पक्षी पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून येत होता परंतु आता त्या मानाने या पक्षांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक औषधी फवारणी असे आहे. कारण हे पक्षी शेतातील कीटक, उंदीर इत्यादी खातात.
त्यामुळे या उंदराचा मृत्यू जर या कीटकनाशकांद्वारे झालेला असेल तर त्या पक्षांच्या पोटामध्ये हे विषारी खाद्य जाते आणि अकालीत पक्षी मरण पावतात किंवा या पक्षांचे अंडे पातळ कवचाचे तयार होतात व ते अकाली फुटतात. यामुळे या पक्षांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आहे.
ऑस्ट्रेलिया शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. तेथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक औषधांवर बंधने आणले आहेत. तसेच या पक्षांच्या संख्या धोक्यात असल्यामुळे या पक्षांना चिंताग्रस्त पक्ष म्हणून घोषित केलेले आहे.
FAQ
कापशी घार पक्षी कोठे आढळून येतो?
कापशी घार हे पक्षी मुख्यतः सहारा आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय आशिया प्रदेशातील मोकळ्या प्रदेशांमध्ये तसेच भारतातील काही प्रदेशांमध्ये आढळून येतात. हे पक्षी तेथील शेती भागांमध्ये तसेच समुद्रकिनाऱ्यावरील पाणवठ्याच्या प्रदेशामध्ये आढळून येतात.
कापशी घार पक्षी काय खातो?
कापशी घार हे पक्षी उंदीर, बेडूक, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी खातात.
कापशी घार पक्षाची लांबी किती असते?
कापशी घार या पक्षाच्या शरीराची लांबी ही 35 सेंटीमीटर पर्यंत असते.
कापशी घार पक्षी याचे शास्त्रीय नाव काय आहे?
कापशी घार या पक्षाचे शास्त्रीय नाव एलॅनस कॅर्यूलस असे आहे.
कापशी घार या पक्षाचा रंग कोणता असतो?
कापशी घार या पक्षाचा रंग फिकट राखाडी व पांढरा असतो.