Bulbul Bird Information In Marathi बुलबुल हा पक्षी मनुष्य वस्तींमध्ये झाडाझुडपांवर सुद्धा आपल्याला दिसतो जणू काही त्याने टोपीस घातली आहे अशा लांब शेपटीचा हा एक पक्षी आहे बुलबुल पक्षाचा समावेश पक्षी वर्गाच्या पॅसिरिफॉर्मिस मध्ये येतो. हे पक्षी तव्यामध्ये राहतात तसेच गोंगाट करतात. बुलबुल या पक्षांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात तसेच हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाळली सुद्धा जातात. या पक्षाच्या जगावे मध्ये 9000 पेक्षा प्रजाती आढळतात त्यांच्या अनेक प्रजाती इतर भारतात सुद्धा आढळतात.

बुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi
पक्षाचे नाव | बुलबुल पक्षी |
इंग्रजी नाव | नाइटिंगेल बर्ड |
वर्ग | पॅसिरिफॉर्मिस |
लांबी | 20 |
प्रजनन काळ | जून – सप्टेंबर |
बुलबुल हा पक्षी कुठे राहतो :
बुलबुल हा पक्षी मुख्यता उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहतो. हा पक्षी मानव वस्तीमध्ये सुद्धा झाडांच्या किंवा झुडपांवर राहणे पसंत करतात. बुलबुल हे आपले घरटे काटेरी गवतापासून बनवतात. त्यांची घरटे हे गोलाकार असून हे पक्षी थव्यांमध्ये मध्ये राहणे पसंत करतात.
त्याव्यतिरिक्त हे पक्षी दक्षिण आशियामधील भारत, पूर्व श्रीलंका, म्यानमार व ईशान्य, चीन या ठिकाणी सुद्धा आढळून येतात. त्या व्यतिरिक्त पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांवर यांच्या काही प्रजाती आढळून येतात तसेच न्युझीलँड मध्ये हा पक्षी आताच ठरवला आहे. त्याच्या शब्दाच्या बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो म्हणून त्याला लालबुड्या बुलबुल असे सुद्धा म्हटले जाते.
बुलबुल पक्षाचा आहार :
बुलबुल हा पक्षी झाडांवर राहणारा पक्षी असून तो झाडांवरील अळ्या कीटक, पाने आणि फळे सुद्धा खातो. हे पक्षी खुले वन झुळप असणाऱ्या माढरानात किंवा शेतामध्ये सुद्धा आढळून येतात तसेच हे पक्षी फुलांच्या पाकळ्या मकरंद हे सुद्धा खातात.

बुलबुल या पक्षाचे वर्णन :
बुलबुल हा पक्षी चिमणीपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा असून त्याची लांबी 20 सेंटिमीटर असते आणि त्याचे डोके व गडा हे भाग काळ्या रंगाचे असून त्याचे शरीर मात्र पंख हे फिकट तपकिरी रंगाचे असतात. त्याचे पाठ पंख आणि छातीवरील पिसांच्या कडा ह्या पांढऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर खवले असल्याचा आपल्याला भास होतो.
पोटाकडचा आणि पाठीचा मागचा भाग पांढरा असून शेपूट काळसर तपकिरी रंगाचे असते. तसेच त्याची चोच व पाय हे काळ्या रंगाचे असतात. तर नर मादी दिसायला दोघेही सारखेच दिसतात.
बुलबुल या पक्षाचा प्रजनन काळ :
बुलबुल या पक्षाच्या प्रजननाचा काळ हा जून ते सप्टेंबर हा असतो. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा काळ थोडा मागेपुढे किंवा बदलत असतो. घरटे हे त्यांचे वाडग्यासारखे वाढलेल्या गवतापासून तसेच काटेरी गवतापासून बनवले जाते. त्यांची घरटी हे एक ते तीन मीटर उंचीवर असतात.
काही वेळा झाडांच्या ढोलीमध्ये सुद्धा त्यांची घरटे आपल्याला दिसून येतात. मादी एका वेळेला फिकट गुलाबी रंगाची दोन ते तीन अंडी घालते. बऱ्याच जातीतील बुलबुल पक्षी हा काही वेळा वर्षांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा मादी अंडी घालते ती अंडी 14 दिवसात उगवली जातात. नर व मादी दोघे मिळून घरटे बांधतात अंडी उबवतात तसेच पिल्लांचे भरण पोषण व संरक्षण सुद्धा करतात. त्यांना उडायला शिकवणे इतर काम दोघेही मिळून करतात.
या पक्षाचे प्रकार :
बुलबुल या पक्षाचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये काही प्रजाती ह्या पर्जन्य जंगलामध्ये तर काही मोठ्या शहरी भागात सुद्धा राहतात. बुलबुल या पक्षाचे 17 प्रकारात वर्गीकरण केले जाते.
ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल : हा बुलबुल पक्षी भारतामध्ये आढळणारा सर्वात पक्षी असून तो जंगलात किंवा दाट झाडींमध्ये राहणी पसंत करतो. या पक्षाची लांबी 19 सेंटिमीटर असून त्याच्या नावाप्रमाणे त्याचे डोके आणि मान ही काळे रंगाचे असते तसेच माने खालचा सर्व भाग हा पिवळ्या रंगाचा असतो तसेच रंगसंगतीमुळे हा पक्षी अतिशय सुंदर व आकर्षक दिसतो.
हिमालयीन बुलबुल : हिमालयीन बुलबुल हे पांढरा रंगाचा असतो. त्याला मुख्यता हिमालयीन भारत प्रदेशात सुद्धा पाहिल्या जाते, ही अतिशय सुंदर प्रजाती आहे. हिमालयीन बुलबुल पक्षाची लांबी 18cm एवढी असून त्याचे वजन 30 ग्रॅम एवढे असते. या पक्षाची आणि पंख हे काळ्या रंगाचे असतात. तर तिला लांब तपकिरी रंगाची शेपटी असते तसेच त्याच्या शेपटीच्या खाली गुलाबी रंगाचा ठिपका असतो.
पांढरा बुलबुल : पांढरे कान असलेले बुलबुल हे खूप सुंदर दिसतात तसेच हे बुलबुल पक्षी हिमालयीन बुलबुल पक्षाप्रमाणेच दिसतात. हे पक्षी खारफुटी आणि झुडपांमध्ये राहतात. या पक्षांच्या चोचीचा व मानेचा रंग हा काढा असतो तसेच त्यांचे गाल पांढरे व पंख तपकिरी तसेच त्यांच्या मांड्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या पक्षाची शेपटी काळी असून शेपटी खालचा भाग हा पिवळ्या रंगाचा असतो.
अंदमान बुलबुल : अंदमान बुलबुल ही एक ऑलिव्ह डोके असलेली वेगळीच प्रजाती आहे. तिचे डोके निळे तसेच विस्तीर्ण पिवळ्या शेपटीचे टोक आणि शिळेचा अभाव असतो. त्यामुळे हे दिसायला इतर बुलबुल पेक्षा वेगळे दिसतात; परंतु दिसायला सुंदर तसेच हे त्यांच्या आहारामध्ये फळे बेरी कीटक यांचा समावेश करतात.
पट्टीदार बुलबुल : पट्टीदार बुलबुल हे पक्षी थायलंड, मलेशिया, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांमध्ये आढळून येतात. हे उपोषण कटिबंधीय आणि उष्णकटिबंधातील आद्रसखल जंगलांमध्ये राहतात. त्या व्यतिरिक्त ते आद्र पर्वतीय जंगलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतात.
लाल बुलबुल : लाल बुलबुल हे पक्षी टेकडी जंगलात आणि शहरी भागांमध्ये आपल्याला भागांमध्ये वावरताना दिसतात. हे बुलबुल पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आपल्याला इकडून तिकडे उडताना दिसतात.
काळा बुलबुल : या बुलबुलला ब्लॅक क्रेस्टड बुलबुल असे सुद्धा म्हणतात. हा पक्षी सुद्धा भारतामध्ये आढळून येतो. हा पक्षी मुख्याध्यापक जंगलातील दाट झाडींमध्ये राहणे पसंत करतो. ब्लॅक बुलबुल पक्षाची लांबी 19cm पर्यंत असते तसेच त्याचे डोके व मान काळी असते. मानेखाली सर्व भाग पिवळा असून हा पक्षी दिसायला सुंदर व आकर्षक दिसतो.
निष्कर्ष :
बुलबुल हा पक्षी सुंदर पक्षी असून तो पाळीव सुद्धा आहे. त्यामुळे अनेक लोक त्या पक्षांना बंधनात ठेवतात ; परंतु असे करणे चुकीचे आहे कारण जगण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. त्यामुळे आपण जाणीव ठेवून या पक्षांचे संरक्षण व स्वतंत्र याविषयी जागरूक असले पाहिजे.
FAQ
बुलबुल हे पक्षी पाळीव पक्षी आहेत का?
बुलबुल हे पक्षी पाळीव पक्षी आहेत परंतु त्यांना जंगलात झुडपात राहणे आवडते.
बुलबुल या पक्षाची लांबी किती असते?
बुलबुल्या पक्षाची लांबी आठ ते दहा इंच एवढी असते.
बुलबुल पक्षांमध्ये नर व मादी दोघेही दिसायला कसे असतात?
बुलबुल या पक्षांमध्ये नर व मादी दिसायला दोघेही सारखेच असतात.
बुलबुल हे पक्षी कोणत्या वातावरणात राहतात?
बुलबुल हे पक्षी गरम वातावरणामध्ये राहतात.
बुलबुल या पक्षाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
बुलबुल या पक्षाला इंग्लिशमध्ये नाईटिंगेल बर्ड असे म्हणतात.