Eagle Bird Information In Marathi गरुड हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. या पक्षाला सर्व पक्षांचा राजा म्हणून संबोधले जाते. गरुड हा पक्षी सर्व पक्षांमध्ये शक्तिशाली असा पक्षी आहे. तुम्ही आकाशामध्ये पाहिलेच असेल गरुड हा पक्षी उंच भरारी आणि मोठे पंख पसरून उडतो. तसेच एकाच जागी पंख न हालवता स्थिर सुद्धा राहू शकतो.

गरुड पक्षाची संपूर्ण माहिती Eagle Bird Information In Marathi
गरुड या पक्षाचे अनेक प्रकार आपण ओळखतो त्यामध्ये काही लहान तर काही मोठे पक्षी असून ते शक्तिशाली आहेत. गरुड हा पक्षी एक शिकारी पक्षी आहे तसेच हे त्यांचे शिकार स्वतःच करतात.
पक्षाचे नाव | गरुड पक्षी |
वर्ग | श्येनद्या |
वंश | कणाधारी |
कुळ | गृध्राद्य |
प्रकार | काळा गरुड, टकला गरुड, आफ्रिकन मत्स्य गरुड, ठिपक्यांचा पाणगरुड, तुरेवाला सर्प गरुड, पहाडी गरुड, पांढऱ्या शेपटीचा गरुड इ. |
गरुड हा पक्षी कोठे राहतो
गरुड या प्रजातीचे पक्षी हे उंच ठिकाणावर घरटी बनवतात. त्यांची घरटी ही काड्या कुड्यांपासून तयार केलेली असते आणि हे घरटे ते उंच कड्यांवर किंवा उंच झाडांवर बांधतात तसेच गरुड त्यांच्या पूर्वीच्या घरट्यांमध्ये सुद्धा परत येतात व काड्या फांद्यांची त्यामध्ये भर घालून तेथे पुन्हा नवीन घरटी बांधतात.
गरुड या पक्षाचे निवासस्थान आपण पाहिले तर हे वेगवेगळ्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला आढळताना दिसतात. त्या ते मुख्यतः जंगले, पाणथळ जमीन, तलाव, गवताळ प्रदेश अशा ठिकाणी आढळून येतात. त्या व्यतिरिक्त अंटार्टिका आणि न्यूझीलंड हे देश वगळले असता. जमिनीच्या अनेक ठिकाणी आढळून येतात.
गरुड या पक्षाचा आहार
गरुड या पक्षाचा आहार आपण पाहिला तर हे पक्षी शिकारी पक्षी आहेत तसेच ते मांस भक्षी आहेत. त्यांच्या प्रजातीनुसार त्यांच्या आहारामध्ये आपल्याला फरक जाणवतो. काही गरुडाच्या प्रजाती ह्या सरपटणारे प्राणी खातात तर काही कीटक तर काही प्रजाती मासे, पक्षी, संस्थन प्राणी अशा प्राण्यांवर आपली उपजीविका भागवतात.

हे पक्षी त्यांच्या मजबूत पायांमध्ये आपली शिकार धरून उंच उडतात व एखाद्या उंच ठिकाणावर जाऊन तेथे आपल्या मजबूत चोचीने त्या शिकारीला ओरबडून खातात. गरुड या पक्षाने ज्या शिकार वर लक्ष केंद्रित केले आहे. ती शिकार त्याच्या हातून सुटत नाही एवढी मजबूत पकड गरुड या पक्षाची असते.
गरुड या पक्षाचे वर्णन
गरुड हे पक्षी शिकारी पक्षी आहेत परंतु इतर शिकारी पक्षांच्या तुलनेने गरुड या पक्षांचा आकार थोडा मोठा असतो. गरुड या या पक्षांमध्ये त्यांच्या प्रजातीनुसार आपल्याला आकारमानामध्ये फरक जाणवतो. काही गरुड यांच्या प्रजाती ह्या लहान तर काही मोठ्या असतात. आपण जर सर्व गरुड या पक्षाच्या आकारमानाचा विचार केला तर हे गरुड पक्षी खूप लहान असतात तर फिलिपिन हे गरुड व हर्पि गरुड हे आकाराने थोडे मोठे असतात.
त्यांचे आकारमान 100 सेंटीमीटर पर्यंत असते तर वजन हे 9 किलो पेक्षाही जास्त असते. जंगलांमध्ये राहणाऱ्या गरुड यांचे पंख मात्र लहान असून त्यांची शेपटी ही लांब असते. त्यामुळे त्यांना हवेमध्ये उडताना अगदी सहजपणे पलाटणी घेता येते तसेच हे पक्षी अधिक वेगाने झाडांच्या फांद्यांमधून आपल्या भक्षाचा पाठलाग सुद्धा करतात तेव्हा ते छोट्या पंखांचा उपयोग करतात. परंतु त्यांना या कारणामुळे आकाशात झेपावणे व जमिनीवर उतरणे थोडे अवघड जाते.
गरुड या पक्षाची चोच हे इतर शिकारी पक्षांपेक्षा बळकट व मोठी असते, त्यामुळे ते आपल्या चोचीने मास फाडून खातात. गरुडाचे पाय आणि पंजे हे भक्ष पकडण्यासाठी उपयोगी पडतात आणि त्यांचे पाय खूप मजबूत असतात. गरुडांच्या डोक्याच्या मानाने त्यांचे डोळे खूपच तीव्र दृष्टीचे व मोठे असतात. गरुडांच्या प्रत्येक जातींमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो.
या पक्षांचा रंग म्हणजेच त्यांच्या पिसाचा तपकिरी, काळा, पांढरा, गंज आणि बऱ्याचशा प्रमाणात निळे व राखाडी हे सर्वात जास्त असतात. छोट्या पिल्लांच्या आणि प्रौढ तिसरा अनेक प्रजातींमध्ये आपल्याला दिसून येतो. पांढरे डोके असलेले गरुड पक्षी हे दिसायला अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्यामध्ये लहान पिल्लांचा रंग तपकिरी असतो. गरुड या पक्षाचे वजन हे त्याच्या प्रजातीनुसार हारपी या प्रजातीच्या गरुडाचे वजन हे 14 ते 18 पौंड असते.
तर मादीचे वजन हे सात ते नऊ किलोग्राम पर्यंत असते. गरुड या पक्षाची उंची 60 ते 90 सेंटीमीटर असते आणि पंखांची लांबी ही 1.8 मीटर लांब असते अमेरिकन हर्पि ईगल सर्वात मोठा गरुड पक्षी मानला जातो.
गरुड या पक्षाचे प्रजनन
गरुड हे पक्षी साधारण ते पाचव्या वर्षीच परिपक्व होतात. बरेच गरुडाच्या प्रजाती वर्षाच्या पाचव्या काळातच प्रजनन करतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणात अन्न सेवन करतात. ही पक्षांची प्रजाती वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला अंडी घालतात तसेच या पक्षांविषयी वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा प्रजनांचा कालावधी सुद्धा वेगवेगळा राहतो. पिल्ले उबवल्यानंतर आपल्या पाल्याला सोडून स्वतः नवीन प्रदेश शोधतात.
गरुड या पक्षाचे धार्मिक महत्त्व
गरुड या पक्षाचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. गरुड पुराण हे गरुडाला समर्पित असून हिंदू धर्मामध्ये ते खूप महत्त्वाचे मानले जाते. गरुड हा पक्षी भारतात पूजनीय आहे कारण गरुड हा पक्षी विष्णू या देवताचे वाहन मानले आहे.
गरुड या पक्षाचे प्रकार
गरुड या पक्षाचे प्रकार आपण पुढील प्रमाणे पाहूया.
बुटेट गरुड : या गरुडाची प्रजाती ही पायांपर्यंत पिसांनी भरलेली आहे, त्यामुळे त्याच्या पाय बूट घातल्यासारखे आपल्याला दिसतात. त्यामुळे यावरूनच या गरुडाचे नाव बूट गरुड असे पडले.
मत्स्य गरुड : मत्स्य गरुड हा मोठ्या प्रमाणावर मास्यांची शिकार करते व या गरुडाचे मुख्य खाद्य सुद्धा मासे आहे, त्यामुळे या गरुडाचे नाव मत्स्य गरुड असे पडले.
सर्प गरुड : ही प्रजाती सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो. हे गरुड मोठ्या प्रमाणावर साप खातात, त्यामुळे यांना सर्प गरुड असे म्हटले जाते. हा पक्षी सापाला उंचीवरून पाहू शकतो तसेच पायामध्ये सापाला पकडल्यानंतर उंचीवर नेऊन खाली सोडतो व नंतर त्याची शिकार करतो.
फिलिपाईन ईगल : फिलिपाईन ईगल हे सर्प गरुडाशीच निगडित आहे. ही प्रजाती फिलिपाईन्समध्ये आढळते, त्यामुळे याला फिलिपाईन ईगल असे म्हटले जाते.
निर्जन गरुड : या गरुडाच्या प्रजातींच्या पक्षांच्या डोक्यावर मुकुट असल्यासारखे दिसते त्यामुळे त्यांना ब्राऊन ईगल असे सुद्धा म्हटले जाते. ही प्रजाती दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते.
हर्पि गरुड : हर्पि गरुड ही प्रजाती आकाराने खूप मोठी असते तसेच हे ईगल उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामध्ये गरुडाच्या दोन ते सहा प्रजाती आणखीन पडतात. हे प्रजाती मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळते.
FAQ
गरुड हा पक्षी कोठे राहतो?
गरुड हा पक्षी उंच कड्यांवर किंवा मोठ्या झाडावर घरटी करून राहतो.
गरुड हा पक्षी किती वर्ष जुना आहे?
गरुड हा पक्षी पौराणिक कथेनुसार 3000 वर्षाहून अधिक जुना आहे असे मानले जाते. कारण त्याची सुरुवात हिंदू धर्मापासून झालेली आहे.
गरुड हा पक्षी काय खातो?
गरुड हा पक्षी साप, मासे, कोल्हे, ससे, माकडे आणि हरीण सुद्धा खातो.
गरुड हा पक्षी कोणता पक्षी आहे?
गरुड हा एक शिकारी पक्षी आहे.
सर्वात मोठ्या गरुडाची प्रजाती कोठे आढळते?
हर्पि गरुड हा सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली असा पक्षी आहे.