Falcon Bird Information In Marathi ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे, या पक्षांचा समावेश पक्षी वर्गाच्या फॅल्कॉनिडी या कुळात केला जातो. या कुळामध्ये ससाण्याच्या एकूण 40 जाती आढळून येतात. हे पक्षी अंटार्टिका खंड सोडले असता जगात सर्वत्र आढळून येतात. भारतामध्येच या पक्षाच्या एकूण 15 जाती आढळून येतात, त्यापैकी तीन ते चार जाती ह्या भारतीय निवासी आहेत.

ससाणा पक्षाची संपूर्ण माहिती Falcon Bird Information In Marathi
महाराष्ट्रामध्ये या पक्षाला बहिरी ससाणा या नावाने सुद्धा ओळखले जाते. बहिरी हा शब्द अरबी भाषेतील असून बाहेरी या शब्दावरून आलेला आहे याचा अर्थ त्याला हुशार असा होतो. या पक्षांच्या प्रजातीवरून त्यांच्यामध्ये भिन्नता पाहायला मिळते. या पक्ष्यांचे वजन व आकार यामध्ये त्यांच्या जातीनुसारच फरक जाणवतो.
पक्षाचे नाव | ससाना पक्षी |
कुळ | फॅल्कॉनिडी |
शास्त्रीय नाव | फॅल्को पेरिग्रीनस |
रंग | करडा |
आयुष्य | 20 वर्ष |
वजन | 500-1500 gm |
लांबी | 25-65 cm |
ससाणा हा पक्षी कुठे राहतो
ससाणा हे पक्षी साधारणता हिमालय पर्वत रांगांच्या पूर्वेकडे म्हणजेच अरुणाचल प्रदेश, नेपाळ येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे पक्षी एप्रिल ते जून या काळात भारतामध्ये प्रवेश करतात. या पक्षांचे वास्तव्य हे डोंगराच्या कपारी वनांच्या मध्यस्थीत असलेली शेती पाणथळ जागा, झाडांच्या ढोली किंवा डोंगराळ समुद्रकिनारे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. हे पक्षी स्वतःचे घरटे कधीच बांधत नाही.
ससाणा पक्षाचा आहार
ससाणा हे पक्षी त्यांच्या अन्नासाठी आकाशात उडत असतात. हे पक्षी उडणारे कीटक, लहान पक्षी, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, लहान संस्थन प्राणी यांची शिकार करतात. हे पक्षी भक्ष पकडताना त्यांच्या नफ्यांचा वापर करतात आणि पक्षाच्या पाठीचा कणा सूचीने पकडून त्याला मारतात व खातात.

ससाणा पक्षाचे वर्णन
ससाणा या पक्षाचे शरीर रचना ही शिकारी पक्षासारखे असते. या पक्षांमध्ये त्यांच्या जातीनुसार शरीराच्या तसेच रंगांमध्ये विविधता पाहायला मिळते. या पक्षांच्या शरीराची लांबी हे 25 सेंटीमीटर असते. तर मोठ्या ससाण्याच्या जातीच्या शरीराची लांबी ही 65 सेंटीमीटर एवढी असते. शरीराच्या तुलनेने या पक्षाचे डोके मोठे असून त्याचे डोळे हे भेदक असतात.
डोळ्याखाली असलेले पट्टे उठून दिसतात या पक्षांची चोच आखूड व बागदार असते तसेच पायांच्या बोटांवर बागदार नखे असतात. हे त्यांच्या शरीराचे वैशिष्ट्य आहे. या पक्षांच्या शरीरामध्ये तर विविध आढळून येते तसेच त्यांच्या शरीरातील रंगांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. या पक्षांचे नर व मादी दिसायला सारखेच दिसतात परंतु मादी ही नरापेक्षा थोडी मोठी असते.
हे पक्षी अतिशय चपळ असून वेगवान असतात, त्यामुळे हे पक्षी इतर पक्षाची शिकार चपळतेने करतात. ससाणाच्या काही जाती हवेतून खाली येताना साधारणपणे 320 किलोमीटर प्रति वेगाने उतरतात आणि भक्षावर झपट मारून त्याला पायाच्या नख्यांमध्ये धरून वर उचलून नेतात.
ससाणा पक्षाचा प्रजनन काळ
ससाणा या पक्षांचा प्रजनन काळ हा जानेवारी ते मे असा असतो. हे पक्षी कावळ्यांसारखे त्यांचे घरटे तयार करतात. या पक्षांचे घरटे हे काट्याकुट्यांचे पाने, गवत मिळून तयार केलेले असते. हे पक्षी घरटे झाडांवर किंवा कड्यांवर उंच जागी बांधतात. त्या घरट्यामध्ये मादी तीन ते पाच अंडी घालते.
या पक्षाची अंडी ही करड्या रंगाची असून त्यावर ठिपके असतात. या पक्ष्यांची मादी व नर दोघेही पिल्लांचा सांभाळ करतात तसेच अंडी उबवण्याचे काम मादी करते. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर नर व मादी दोघे मिळून पिल्लांना अन्न भरवतात.
ससाणा पक्षाचे प्रकार
लग्गड ससाणा : भारतामध्ये ही प्रजाती सामान्यता सगळीकडे आढळून येते. या जातीचे शास्त्रीय नाव फॅल्को जुग्गर असे आहे. या प्रजातीचे ससाणा पक्षी हे अफगाणिस्तान, इराण, भूटान, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशांमध्ये सुद्धा आढळून येतात. या पक्षाच्या शरीराची लांबी 40 ते 45 सेंटीमीटर असते तसेच या पक्षाचे वजन 500 ते 850 ग्रॅम असते.
या पक्षाच्या शरीराची वरची बाजू तपकिरी असून तिच्या करड्या रंगाच्या छटा दिसतात तसेच छातीवर तपकिरी रेषा आणि पोटावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या पक्षांच्या चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना मिशन सारखे तपकिरी पट्टे असतात. या पक्षांचे पंख लांब असून टोकदार असतात चोच ही बागदार व किंचित फिकट निळसर रंगाचे असते व पाय पिवळे असतात.
बहिरी ससाणा : ससाण्याची ही प्रजाती युरोप खंडामध्ये आढळून येते. हे पक्षी हिवाळ्यात भारतात येतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा परत जातात. या पक्षाच्या शरीराची लांबी 34 ते 58 सेंटीमीटर असते तसेच या पक्षांचे वजन 500 ते 1500 ग्रॅम पर्यंत असते. या पक्षाचे डोके काळे असून शरीर काळपट रंगाचे असते. तसेच पोटाकडचा भाग गुलाबी, पांढरा असतो. हे पक्षी दिसायला आकर्षक दिसतात. ही प्रजाती हे काळी दुर्मिळ झाली होती परंतु या पक्षाचे संवर्धन केल्यामुळे आता या पक्षांची संख्या दिसत आहे.
शाही ससाणा : शाही ससाणा हा अतिशय दुर्मिळ पक्षी आहे. हे पक्षी युरोप आखात व आशियामध्ये आढळून येतात. हा एक कावळ्याच्या आकाराचा पक्षी असून भारतात हा अतिशय दुर्मिळ आहे. हा पक्षी अतिशय चपळ असतो तसेच त्याचे पंख टोकदार असून जगात सर्वात वेगवान पक्षांमध्ये याची गणना केली जाते.
निष्कर्ष :
ससाणा हा पक्षी निसर्ग चक्रामधील महत्त्वाचा घटक आहे. या पक्षांच्या पर्यावरणात अस्तित्वामुळे निसर्ग चक्र संतुलित राहते. हे पक्षी साप, उंदीर यांसारखे शेतीच्या नुकसान करणारे प्राणी खातात परंतु गेल्या काही काळात या पक्षांच्या काही प्रजाती विलुप्त झाल्या होत्या तसेच काही जाती ह्या विलुप्त होण्याच्या मार्गावर होत्या. त्यामध्ये शासनाने या पक्षासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या पक्षांच्या लुप्त होण्याचे कारणे ते म्हणजे शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खते किंवा विषारी फवारणी केली जाते आणि हे पक्षी शेतातील अनेक प्राणी खातात. त्यामुळे यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तर काही देशांमध्ये ससाणाच्या प्रजाती पाळल्या जातात आणि त्याचा उपयोग शिकारीसाठी केला जातो.
FAQ
ससाणा हा पक्षी काय खातो?
ससाणा हा पक्षी सरपटणारे प्राणी, हवेत उडणारे कीटक, पक्षी सस्थन प्राणी इत्यादी खातो.
ससाणा या पक्षाच्या किती जाती आढळून येतात?
ससाणा या पक्षाच्या एकूण 40 जाती आढळून येतात.
ससाणा हा पक्षी कोठे आढळतो?
ससाणा हा पक्षी अंटार्टिका खंड वगळता जगात इतर सर्वत्र आढळून येतो.
ससाणा या पक्षाला हिंदी मध्ये काय म्हणतात?
ससाणा या पक्षाला हिंदी मध्ये चिडी बाज, गौरेया, असे म्हणतात.
ससाणा या पक्षाचे कोणते वैशिष्ट्य आहे?
ससाणा या पक्षाचे वैशिष्ट्य असे असते की, हे पक्षी जमिनीवरील शिकार पकडण्यासाठी अतिशय वेगाने झपट मारतात.