Greater Flamingo Bird Information In Marathi रोहित हा पक्षी एक पाणपक्षी आहे, जो पाण्यामध्ये राहतो व पाण्यामधील मासे खातो. हा पक्षी फिनीकॉप्टेरीफार्मिस या गणामध्ये येतो तसेच हा पक्षी फिनीकॅप्टेरीडी या कुळात येतो. हा पक्षी हंसक या नावाने सुद्धा ओळखला जातो. या कुळामध्ये ही एकच प्रजाती आढळून येते.

रोहित पक्षाची संपूर्ण माहिती Greater Flamingo Bird Information In Marathi
जगामध्ये सर्वत्र रोहित पक्षाच्या एकूण सहा जाती आढळून येतात. त्यामध्ये मोठा रोहित पक्षी, लहान रोहित पक्षी, चिलियन रोहित पक्षी, प्यूना रोहित पक्षी, इंडियन रोहित पक्षी आणि अमेरिकन रोहित पक्षी. हा पक्षी जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या पंखाची काळी घेणार आणि आतील पंखाचा ज्वालासारखा भडक गुलाबी रंग दिसतो. त्यामुळे या पक्षाला अग्निपंखी असे सुद्धा म्हटले जाते.
पक्षाचे नाव | रोहित पक्षी |
कुळ | फिनीकॅप्टेरीडी |
रंग | गुलाबी, पांढरा |
वजन | 2 ते 4 kg |
उंची | 110 ते 150cm |
रोहित हा पक्षी कुठे राहतो :
रोहित पक्षी काही भारतामध्ये आढळून येतो. त्या व्यतिरिक्त युरोप, आफ्रिका, आशिया येथे सुद्धा आढळून येतात. त्या व्यतिरिक्त हे पक्षी अमेरिकेमध्ये सुद्धा आढळून येतात. रोहित हा पान पक्षी असल्यामुळे नेहमीच तलाव, दलदलीचे प्रदेश सरोवरे व खाडी जलाशय किंवा उथळ पाण्याच्या ठिकाणी राहतो व तेथेच वावरतो. हे पक्षी थव्याने राहतात.
रोहित या पक्षाचा आहार :
रोहित हे पक्षाच्या शरीराची रचना व्यवस्थित असल्यामुळे ते डोके चोच पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून पाण्यातील चिखलातील खाद्य गाळून घेतो व नंतर खातो. त्याच्या आहारामध्ये शेवाळ, वनस्पती, बिया डिंभ, पान कीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे व शिंपले हे असते.
रोहित या पक्षाचे वर्णन :
भारतामध्ये आढळणारा रोहित पक्षी हा मोठा व लहान आहे या दोन्ही जाती भारतामध्ये आढळून येतात. हे पक्षी दिसायला आकर्षक दिसतात. या पक्षांची उंची 110 ते 150 सेमी असून त्याचे वजन दोन ते चार किलो पर्यंत असते. या पक्षाच्या शरीराचा रंग गुलाबी पांढरा असतो. त्यांचे पाय लांब का काटकोडे आणि गुलाबी रंगाचे असतात.

या पक्षाचे मान उंच व नागमोडी असते. या पक्षाची चोच ही गुलाबी व जाडसर असून मध्येच पिवळटल्यासारखी दिसते. रोहित पक्षाचे शेपूट आखूड असून हे नेहमीच एका पायावर उभे राहतात. प्रौढ रोहित पक्षांचा रंग फिकट गुलाबी व चमकदार लाल असतो.
रोहित या पक्षाचा प्रजनन काळ :
रोहित हा पक्षी समाजप्रिय पक्षी आहे. हे पक्षी त्यांच्या वसाहतीमध्ये हजारोच्या संख्येने राहतात. या पक्षाच्या वेणीचा हंगाम हा सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि मार्च ते एप्रिल असा असतो वहिनीचा हंगाम सुरू होण्याच्या आधी या पक्षांच्या वसाहतीमध्ये 15 ते 50 पक्षांचे लहान लहान गट तयार होतात.
भारतामध्ये गुजरात राज्यातील कच्छच्या रणात हे पक्षी मोठ्या संख्येने जमा होतात. हे पक्षी चिखलाच्या लहान लहान गोळ्यांनी घरटे तयार करतात. हे पक्षी त्यांचे घरटे शंकूच्या आकाराचे तयार करतात. दरवेळेला या घरट्यांमध्ये एक मादी एक अंडी निळसर रंगाचे घालते. जवळजवळ एक महिना हे अंडे नर व मादी मिळून उबवितात. या पिल्लांचा रंग भुरकट लाल असतो. पिलाचे संगोपन नर व मादी दोघे मिळून करतात.
रोहित या पक्षाचे प्रकार :
मोठा रोहित पक्षी : मोठा रोहित पक्षी हा भारतामध्ये आढळून येतो तसेच हे पक्षी पावसाळ्यानंतर कच्छ मधले जेव्हा पाणी आटते तेव्हा मोठ्या संख्येने स्थलांतर करतात आणि देशात इतर सर्वत्र पसरतात. काही वर्षांमध्ये जलाशयातील पाण्यामध्ये होणारी घट यामुळे या पक्ष्यांची मोठ्या संख्येने घट झाली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ऑक्टोबर पासून ते मे पर्यंत हे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात.
लहान रोहित पक्षी : लहान रोहित पक्षी हे सर्वात छोटी प्रजाती आहे. हे पक्षी 80 ते 90 सेमी लांब असून या पक्षाचे वजन एक ते अडीच किलो पर्यंत असते. या पक्षाचा शरीराचा भाग हा गुलाबी पांढुरका असतो. लहान रोहित आणि मोठा रोहित पक्षी यांच्यातील एक फरक असा आहे की, लहान रोहित पक्षाच्या चोचीचा बराचसा भाग हा काळा असतो. हे पक्षी थव्यामध्ये राहतात. त्यांच्यात थव्यामध्ये दोन ते दहा लाख पर्यंत पक्षी असू शकतात.
चिलियन रोहित पक्षी : रोहित पक्षांची प्रजाती ही दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. हे पक्षी पाणपक्षी असून पाण्यातील मासे, खेकडे, वनस्पती शेवाळ, शिंपले इत्यादी त्यांचे अन्न आहे.
अमेरिकन रोहित पक्षी : अमेरिकन रोहित पक्षी हा कॅरिबियन बेटे, कॅरिबियन मेस्कीको आणि गालापागोस बेटे येथे आढळून येतो. हे पक्षी सुद्धा छोटे मासे, किडे, पाण वनस्पती व शेवाळ खातात. या पक्षांचे जीवन हे पन्नास वर्षापर्यंत असते.
निष्कर्ष :
रोहित हा पक्षी समाजप्रिय पक्षी आहे. हे पक्षी थव्याने राहणे पसंत करतात. हे पक्षी पाणवठ्याच्या जागी आपले घरटे बनवतात व तेथेच राहतात. त्यांचा आहार सुद्धा पाण्यातील शेवाळ, शिंपले, खेकडे, मासे इत्यादी आहेत यावरच ते आपली उपजीविका भागवतात. परंतु वाढत्या तापमानामुळे जलाशयाचे पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
त्यामुळे ह्या पक्षांच्या समस्या वाढ झालेल्या आहेत. त्यांना राहण्यासाठी जलाशय किंवा तलाव दलदलीचे प्रदेश कमी होत आहेत तसेच पुरेसा अन्नाचा पुरवठा न झाल्यामुळे हे पक्षी त्यांची पिल्ले वाचवू शकत नाही परिणामी त्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. याविषयीची दखल पक्षी संवर्धन विभागाने घ्यायला पाहिजे व या पक्षांविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे.
FAQ
रोहित पक्षी हे भारतीय आहेत का?
होय, रोहित पक्षी हे भारतीय आहेत. परंतु जेव्हा भारतातील तलाव किंवा पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात.
रोहित या पक्षाचे वजन किती असते?
रोहित या पक्षाचे वजन हे 1 ते 4 किलो पर्यंत असते.
रोहित या पक्षाची उंची किती असते?
रोहित या पक्षाची उंची 110 ते 150 सेमी असते.
रोहित हा पक्षी काय खातो?
रोहित हा पक्षी खेकडे, शिंपले, कोलंबी, मासे, शेवाळ इत्यादी खातो.
रोहित हा पक्षी कोणत्या कुळात येतो?
रोहित हा पक्षी फिनीकॅप्टेरीडी या कुळात येतो.