कमळ पक्षाची संपूर्ण माहिती Lotus Bird Information In Marathi

By आकाश लोणारे

Published On:

Follow Us

Lotus Bird Information In Marathi कमळ पक्षी हा एक पाणपक्षी आहे तसेच या पक्षाच्या जवळपास आठ प्रजाती आढळून येतात. त्यापैकी भारतामध्ये दोन प्रजाती सर्वत्र दिसतात. त्यामध्ये लांब शेपटीचा कमळ पक्षी आणि कास्यपंखी कमळ पक्षी. या पक्षाच्या उरलेल्या सहा प्रजातीमध्ये आफ्रिकन कमळ पक्षी, आफ्रिकेनेस कमळ पक्षी किंवा अमेरिकन कमळ पक्षी, ऑस्ट्रेलियन कमळ पक्षी, मादागास्कर कमळ पक्षी, गुलुली असलेला कमळ पक्षी व छोटा कमळ पक्षी या प्रजाती आढळून येतात. येथे आपण लांब शेपटीचा कमळ पक्षी याविषयी माहिती पाहणार आहोत. या पक्षाला पाणमोर असे सुद्धा म्हटले जाते.

Lotus Bird Information In Marathi

कमळ पक्षाची संपूर्ण माहिती Lotus Bird Information In Marathi

या पक्षाचे शास्त्रीय नाव हे हायड्रॉफॅशनस कायरूर्गस असे आहे. हे पक्षी मोठ्या प्रमाणात तरंगणाऱ्या वनस्पती असलेल्या छोट्या तलावांमध्ये किंवा मोठ्या तलावांमध्ये आढळून येतात.

पक्षाचे नावकमळ पक्षी
कुळजॅकॅनिडी
शास्त्रीय नावहायड्रॉफॅशनस कायरूर्गस
रंगतपकिरी
आयुष्य5-10 वर्ष
वजन 190-230gm
लांबी 30cm

कमळ पक्षी कुठे राहतो :

कमळ पक्षी हे तरंगणाऱ्या वनस्पती असलेल्या लहान मोठ्या तलावांमध्ये आढळून येतात. हे पक्षी उष्णकटिबंधीय भारत तसेच दक्षिण पूर्व आशिया आणि इंडोनेशिया येथील निवासी असून हे पक्षी कंबोडिया, चीन, बांगलादेश, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, म्यानमार, ओमान, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, थायलंड या देशांमध्ये सुद्धा आढळून येतात. कमळ पक्षी हे हंगामानुसार स्थलांतर करणारे पक्षी आहेत.

कमळ पक्षाचा आहार :

कमळ पक्षी हे पाणपक्षी असल्यामुळे त्यांच्या आहारामध्ये कीटक, मृदूकाय प्राणी त्यामध्ये गोगलगाय, शिंपले, तरंगणाऱ्या वनस्पती व पाण्याच्या पृष्ठभागावर अपृष्ठवंशीय प्राणी हे सुद्धा खातात. हे पक्षी शेवाळ, मासे वनस्पतीच्या बिया, वनस्पती सुद्धा खातात. हे पक्षी पाण्यात पोहत असताना आपले अन्न शोधतात व खातात.

Lotus Bird Information In Marathi

कमळ पक्षाचे वर्णन :

लांब शेपटीचा कमळ पक्षी हा पाणमोर या नावाने सुद्धा ओळखला जातो. या पक्षाचे शास्त्रीय नाव हायड्रॉफेशनस कायरुर्गस असे आहे. इतर कमळ पक्षांच्या तुलनेमध्ये हीच आकाराने सर्वात मोठी प्रजाती आहे. या पक्षांची लांबी हे 30 सेमी असून मादी नरापेक्षा मोठी असते. मादीचे वजन 190 ते 230 ग्रॅम पर्यंत असते तर नराचे वजन 120 ते 140 ग्रॅम पर्यंत असते. प्रौढ पक्षांच्या पंखाची लांबी हे 19 ते 24 सेमी लांब असते.

या पक्षाच्या घोट्याची व पायाच्या अस्ती ह्या 4 ते 6 सेमी लांब असतात. हे पक्षी उथळ पाण्याजवळ आणि दलदल असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या पक्षाच्या पायांचा रंग हिरवट छटायुक्त असतो तसेच पायाची बोटे आणि नखे सुद्धा लांब असतात. यामुळेच हे पक्षी उथळ पाण्यातील वनस्पतीच्या पानांवरही सहजपणे चालू शकतात.

कमळ पक्षी या यांचा प्रजनन काळ :

कमळ पक्षांच्या विनीचा हंगाम हा उत्तर आशियामध्ये उन्हाळ्यामध्ये तर भारत, श्रीलंका, दक्षिण पूर्व आशियामध्ये पावसाळ्यामध्ये येतो. दक्षिण भारतात जून ते सप्टेंबर हा या पक्षांचा विणीचा हंगाम असतो. विनीच्या हंगामामध्ये मादी पेक्षा नर दिसायला सुंदर दिसतो व आकर्षक असतो.

या पक्षांची शेपटी लहान व मजबूत असते. विणीच्या हंगामात यांच्या शरीराची शेपटीसहित लांबी ही 40 ते 60 सेमी एवढी असते. प्रजनन काळामध्ये या पक्षाच्या शेपटीमध्ये होणारा बदल हेच या पक्षाचे वैशिष्ट्य असते. या काळामध्ये पक्षाचा चेहरा, मान व पंख यावर शुभ्र पांढरा रंग येत असतो.

या पक्षाचे शरीर तपकिरी रंगाचे असते, उड्डाण करताना पांढरे शुभ्र पंख आणि त्यांना काळसर किनार दिसते. विनीचा हंगाम नसताना या पक्षांचा शरीराचा रंग हा गडद तपकिरी असतो. नर पक्षी मादीला तिच्या भोवती पिसारा फुलवून नाचतो आणि वेगवेगळे आवाज काढून तिला प्रभावित करतो. मादी पाणवनस्पतीची पाने आणि देठांच्या सहाय्याने खोलगट असे घरटे तयार करते आणि त्या खड्ड्यामध्ये चकचकीत चार काळे ठिपके असलेली गडद हिरवी, तपकिरी अंडी घालते तसेच दोन अंडी घालण्यामध्ये तिला 24 तास लागतात.

अंडी घातली की, नर हे अंडी उबवण्याला सुरुवात करतो. अंडी उबवण्यासाठी 26 ते 28 दिवस लागतात अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर मादी पिल्लांचे इतर पान पक्षांपासून संरक्षण करते. संकटकाळी हे पक्षी पंखाच्या किंवा छातीच्या सहाय्याने किंवा सूचीच्या सहाय्याने अंडी इकडून तिकडे नेतात तर कधीकधी पान वनस्पतीच्या पानांवर अंडी ढकलून तरंगत सुद्धा नेतात.

कमळ पक्षी या पक्षाचे प्रकार :

कास्यपंखी कमळ पक्षी : या प्रजातीच्या पक्षांच्या पंखांचा रंग हा पिवळसर तपकिरी असतो तसेच त्यावर चकचकीत हिरव्या जांभळ्या रंगाची छटा असते. या पक्ष्यांचे डोके, मान व छाती हे काळ्या रंगाची असून डोळ्यांच्या वरच्या भागापासून ते मानेच्या मागील भागापर्यंत जाणारा पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसतो.

या पक्षांची चोच ही हिरवट पिवळी असून वरील चोचीच्या बुडाशी लाल असते. या पक्षांची शेपटी आखूड व तपकिरी लाल रंगाची असते तसेच तिच्या कडा काळ्या रंगाच्या असतात. या पक्षांचे पाय फिकट हिरवट रंगाचे असतात. पायांची बोटे लांब सरळ असून पायाच्या मागील बोटांचे नखे इतर बोटांच्या नखांपेक्षा लांब असतात. हे पक्षी दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळून येतात. नर मादी दोघेही दिसायला सारखे असतात.

छोटा कमळ पक्षी : या प्रजातीचे कमळ पक्षी सर्वात लहान आकाराने असून त्यांची लांबी 15 ते 16 सेमी असते तसेच त्याचे वजन हे 41 ग्राम एवढे असते.

आफ्रिकन कमळ पक्षी : आफ्रिकन कमळ पक्षी हा सर्व पक्षांच्या तुलनेत जास्त जगतो. या पक्षाचे आयुष्य हे पाच ते दहा वर्षापर्यंत असते.

ऑस्ट्रेलियन कमळ पक्षी : ऑस्ट्रेलियन कमळ पक्षी हा ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आढळून येतो. हे पक्षी तेथील पाणथळ जागेमध्ये राहतात. हे पक्षी सुद्धा पाण्यातील गवत, शिंपले, मासे, पान वनस्पतींची बीजे, कीटक इत्यादी खातात.

निष्कर्ष :

कमळ पक्षी हा एक पाणपक्षी आहे तसेच पाणपक्षी हे तलाव, समुद्र किंवा जलाशयाचे सौंदर्य वाढवून पर्यावरणाचा समतोल राखतात. या पक्षांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे लक्षात येत आहे. कारण आजकाल मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण यामुळे या पक्षांच्या जीविताला हानी पोहोचत आहे.

या पक्षांची वाढती संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे. जर आपल्याला हे सौंदर्य असेच टिकून ठेवायचे असेल तर प्रदूषण कमी करावे लागेल. त्या व्यतिरिक्त पक्षी संवर्धन विभागाने या पक्ष्यांच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. त्याकरिता अनेक देशातील शासनाने सुद्धा कमळ पक्षी वाचवण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजे.

FAQ

कमळ पक्षी आणखीन कोणत्या नावाने ओळखला जातो?

कमळ पक्षी हा पाणमोर, पियू, या नावाने सुद्धा ओळखला जातो.

कमळ पक्षी हे कोणत्या कुळातील पक्षी आहेत?

कमळ पक्षी हे जॅकॅनिडी या कुळातील पक्षी आहेत.

कमळ पक्षी हा कोठे राहतो?

कमळ पक्षी हा एक पान पक्षी आहे, त्यामुळे हे पक्षी जलाशय, तलाव, समुद्र अशा ठिकाणी आढळून येतात.

कमळ पक्षी काय खातो?

कमळ पक्षी हे पाण्यातील कीटक, लहान मासे, शंख व शिपले तसेच गोगलगायी पान वनस्पतीच्या बिया इत्यादी खातात.

कमळ पक्षांचे आयुष्य किती असते?

कमळ पक्ष्यांचे आयुष्य हे पाच ते दहा वर्ष असते.

Was this article helpful?
YesNo

आकाश लोणारे

माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी, लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

Leave a Comment