Moorhen Bird Information In Marathi पाणकोंबडी हा पक्षी पाणथळ प्रदेशात आढळून येणारा एक पक्षी आहे. हा पक्षी तीतर या पक्षाच्या आकाराएवढा असतो. हे पक्षी साधारणता पाण्यामध्ये राहतात व तेथेच आपली शिकार करतात. या पक्षांना पाण्यात पोहण्याची कला अवगत आहे, त्यामुळे हे पक्षी पाण्यात शेपटीला झटका देऊन पाण्यात पोहतात.

पाणकोंबडी पक्षी पक्षाची संपूर्ण माहिती Moorhen Bird Information In Marathi
संकटकाळी वेगाने पोहोचतात पडतात हे पक्षी जास्त दूर होऊ शकत नाहीत. या पक्षाचा समावेश ग्रुईफार्मिंस या गणाच्या रॅलीडी कुळात होतो. पाणकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस असे आहे.
पक्षाचे नाव | पाणकोंबडी |
कुळ | रॅलीडी |
शास्त्रीय नाव | गॅलिन्यूला क्लोरोपस |
रंग | काळा, जांभळा, पांढरा |
आयुष्य | 7 ते 10 वर्ष |
वजन | 250-500gm |
लांबी | 30-32cm |
पाणकोंबडी हा पक्षी कुठे राहतो :
पाणकोंबडी हे पक्षी पाणथळ प्रदेशांमध्ये आढळणारे पक्षी आहेत हे पक्षी ध्रुवीय प्रदेश किंवा उष्ण प्रदेश वगळता जगात सर्वत्र आढळून येतात. हे पक्षी पाण्याजवळच झुडपाखाली किंवा जमिनीवर टोपलीच्या आकाराचे घरटे बांधून त्यामध्ये अंडी घालतात व तेथे राहतात.
पाणकोंबडी या पक्षाचा आहार :
पाणकोंबडी हे पक्षी पाणपक्षी असून हे पक्षी विशेषता एकटे किंवा जोडीने किंवा टोळीने सुद्धा फिरताना दिसतात. हे पक्षी त्यांच्या आहारामध्ये पाणवनस्पती, धान्य, कीटक, गोगलगायी व शिंपले हे सुद्धा खातात. ही प्रजाती भित्री असते. त्यामुळे ती चाहूल लागतात लपून बसतात. हे पक्षी पाण्यात सुद्धा पोहतात.
पाणकोंबडी या पक्षाचे वर्णन :
पाणकोंबडी हा पक्षी आकाराने तीतर या पक्षा एवढा आहे. या पक्षाच्या शरीराची लांबी ही 30 ते 38 सेमी पर्यंत असते तसेच या पक्षाचे वजन हे 500 ग्रॅम पर्यंत असते. या पक्षाचे डोके व मान हे करड्या रंगाची असून या पक्षाची छाती व बाजू घडत राखाडी रंगाच्या असतात. या पक्षाचे पंख तपकिरी रंगाचे असून ते मिटलेले असतात.

पंखाच्या कडांची पांढरी किनार ठळकपणे ओळखू येते. शेपटी खालील पिसे पांढऱ्या रंगाची असून डोळे लाल असतात. चोचीपासून कपाळाचा भाग लाल व चोचीच्या टोकाकडील भाग हा पिवळ्या रंगाचा असतो तसेच या पक्षाच्या पायांचा रंग हा हिरवट पिवळा असून बोटे निमुळती व लांब सटक असतात बोटांना पडदे नसतात. त्यामुळे हे पक्षी मऊ दलदलीच्या प्रदेशांमध्ये सुद्धा चालू शकतात. या पक्षांची मादी व नर दिसायला सारखे असतात परंतु नर हे मादी पेक्षा आकाराने मोठे असतात.
पाणकोंबडी या पक्षाचा प्रजनन काळ :
पाणकोंबडी या पक्षाचा विनीचा हंगाम साधारणता जून ते सप्टेंबर असतो. हे पक्षी शांत असले तरी विनीच्या काळामध्ये आक्रमक होतात. नर आपल्या क्षेत्रात इतरनरांना घूसखोरी करू देत नाही तसेच त्यांना पळुन लावतो. एक नर एका मादीशी एकनिष्ठ राहतात.
पाण्याजवळ झुडुपांच्याखाली किंवा जमिनीवर ते मिळून टोपलीच्या आकाराचे एक घरटे बांधतात. मादी एकावेळीला पिवळसर फिक्कट तपकिरी व लालसर ठिपके असलेली पाच ते बारा अंडी घालते. हे अंडी नर व मादी दोघे मिळून उगवतात. त्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मादी पिल्लांचे संरक्षण करते. एका हंगामात मादी एक वेळ पेक्षा अधिक वेळा अंडी घालते. या पक्षांमध्ये आधीच्या विणीतील पिल्ले नवजात पिल्लांची काळजी सुद्धा घेतात. संकट काळी पिल्ले मादीला चिटकून राहतात.
पाणकोंबडी या पक्षाचे प्रकार :
काळी पाणकोंबडी : काळी पाणकोंबडी हे दिसायला तीतर या पक्ष एवढीच असते परंतु या पक्षाचा रंग काळा असतो, त्यामुळे याला काळी पाणकोंबडी या नावाने ओळखले जाते. हे पक्षी पाण्यात जोडीने किंवा एकटे सुद्धा फिरताना दिसतात. हे पक्षी सहसा पाणवट्याच्या जागी राहणे पसंत करतात. त्या व्यतिरिक्त हे पक्षी भात शेती, खाजणे आणि झुडपांमध्ये दडून बसतात.
जांभळी पाणकोंबडी : जांभळ्या रंगाची पानकोंबडी हे भारतात नदीकाठी दलदलीच्या तळी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे पक्षी आकर्षक असून त्यांच्या जांभळ्या या रंगामुळे दुरून सुद्धा चटकन ओळखण्यास येतात. हा पक्षी आकाराने कोंबडी एवढाच असतो. याचा जांभळा, निळा रंग असून त्याचे पाय लांब व तांबड्या रंगाच्या असतात.
पायाचे बोटे लांब असतात. कपाळ तांबडे असून त्यावर पिसे नसतात, त्याची चोच लहान जाळ आणि लाल रंगाची असते. भुंड्या शेपटीखाली पांढऱ्या रंगाचा एक ठिपका असतो. या पक्षाच्या शेपटीखाली वर हलवण्याच्या सवयीमुळे हे ठिपका सरळ दिसतो. नर व मादी दिसायला दोघेही सारखेच दिसतात तसेच हे पक्षी जोडीने किंवा मोठ्या समूहामध्ये राहतात.
पांढऱ्या छातीची पाणकोंबडी : हे कोंबडी एक पाणपक्षी आहे तसेच आकाराने हे पक्षी तितर एवढा आहे. हा पक्षी जलचर असून या पक्षाचा रंग दगडी पाठीसारखा करडा असून शेपटी भुंडी असते. हे पक्षी पोहण्यासाठी लांब पायाचा उपयोग करतात. या पक्षांचा चेहरा व छाती पांढऱ्या रंगाचे असते तसेच शेवटी खाली लाल भडक रंगाचा एक डाग असतो.
नर व मादी दिसायला दोघेही सारखेच दिसतात. हे पक्षी जोडीने जमिनीवर फिरताना दिसतात तसेच हे पाण्यात सुद्धा पोहतात. हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, मालदीव बेटांवर निवासी असून त्यांच्या विणीचा हंगाम जुन ते ऑक्टोबर हा असतो.
लाजरी पाणकोंबडी : लाजरी पाणकोंबडी या पक्षाच्या अंगावर पांढरट रंगाचे ठिपके दिसून येतात. या पाणकोंबडीची चोच लांबट असून ती पिवळ्या रंगाची असते. हे पक्षी लहान मासे, पाण्यातील किडे, गांडूळ आणि लहान गोगलगायी खातात तसेच पाण वनस्पतीची मुळे, धान्याच्या बिया सुद्धा खातात. हे पक्षी एकटे किंवा जोडीने वावरताना आपल्याला दिसतात.
निष्कर्ष :
पाणकोंबडीची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. हे पक्षी दिसायला आकर्षक दिसतात. त्या व्यतिरिक्त या पक्षांची शिकार कोल्हे, मुंगूस, सरपटणारे मोठे प्राणी सुद्धा करतात. त्यामुळे या पक्षांच्या संख्येत घट होत आहे तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामुळे होणारे जलप्रदूषण कीटकनाशकांचा होणारा मोठ्या प्रमाणात वापर व पाणथळ जागा कमी होत आहेत. यामुळे या पक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. पक्षी संवर्धन विभागाने या विषयीची दक्षता घेऊन या पक्षांना वाचवले पाहिजे.
FAQ
पाणकोंबडी कोणत्या कुळातील पक्षी आहे?
पाणकोंबडी हे पक्षी रॅलीडी या कुळातील पक्षी आहेत.
पाणकोंबडी कोणत्या रंगात आढळते?
पाणकोंबडी हे काळ्या, जांभळ्या व पांढऱ्या रंगांमध्ये आढळून येते.
पाणकोंबडी कोठे राहते?
पाणकोंबडी हे पक्षी सहसा पाण्यामध्ये दलदलीच्या प्रदेशांमध्ये, भाताच्या शेतीमध्ये आढळून येतात.
पाणकोंबडी काय खाते?
पाणकोंबडी हे पक्षी छोटे मासे, गांडूळ, छोट्या गोगलगायी त्या व्यतिरिक्त पाण वनस्पतींची मुळ, धान्य इत्यादी खातात.
पाणकोंबडीचे शास्त्रीय नाव काय आहे?
पाणकोंबडी या पक्षाचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस आहे.