Owl Bird Information In Marathi घुबड हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा पक्षी साधारणतः निशाचर असल्यामुळे दिवसा आपण त्याला पाहू शकत नाही. हे पक्षी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. घुबडांना रात्री स्पष्टपणे दिसते. घुबडांविषयीच्या कहाण्या आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. ज्या आपल्या आधीपासून ते आतापर्यंत चालत आलेल्या आहेत. हा एक पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण पक्षी आहे.

घुबड पक्षाची संपूर्ण माहिती Owl Bird Information In Marathi
घुबड या पक्षांच्या प्रजाती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. अंधश्रद्धेपोटी बरेच लोक घुबडांची शिकार सुद्धा करतात. घुबड या पक्षाच्या जगभर 200 पेक्षा अधिक जाती आढळून येतात. भारतामध्ये त्यांच्या आठ-दहा जाती आढळून येतात. घुबड हे पक्षी भक्षक आहेत. ते रात्री शिकार करतात. छोट्या पक्षांना किंवा प्राण्यांना सुद्धा ठार करून खातात. भारतात साधारणतः पांढऱ्या रंगाचे घुबड आढळते. ज्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा असे आहे.
पक्षाचे नाव | घुबड |
कुळ | स्ट्रायजिडी, टायटोजिडी |
शास्त्रीय नाव | टायटो आल्बा |
लांबी | 72cm |
वजन | एक ते दोन किलो |
रंग | करडा तपकिरी |
घुबड हा पक्षी कुठे राहतो
घुबड हे पक्षी स्वतः घरटे न बांधता ते ससाण्याच्या घरट्यात किंवा कावळ्याच्या जुन्या घरट्यात राहतात. घुबडे त्यांच्या झाडांच्या ढोलीत, गुहेच्या किंवा उंच कड्याच्या कपारीमध्ये तसेच जमिनीत खड्डे करून सुद्धा बिळात घर तयार करतात. घुबड हे पक्षी भारता व्यतिरिक्त इतर देशातही आढळून येतात. घुबड हे पक्षी भारत, अमेरिका, पाकिस्तान, नेपाळ, मेक्सिको तर घुबडांचे काही जाती ह्या युरोप, आशिया व आफ्रिका खंडात सुद्धा आढळून येतात.
घुबड पक्षाचा आहार
घुबड हे पक्षी शिकारी वर्गामध्ये येतात त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये संस्थन प्राणी, कीटक, इतर पक्षी तसेच त्यांच्या काही प्रजाती मासे सुद्धा खातात. हे पक्षी शिकार करून आपले भक्ष्य खातात.

घुबड या पक्षाचे वर्णन
घुबड या पक्षाचे शरीर हे आखुड तसेच भरीव असते. सर्व जातींच्या घुबडांचे डोके मोठे चेहरा हा पसरट असतो. डोळ्याच्या भोवती पिसांचे वलय असून त्यांचे कान डोक्याच्या कडेला नसून ते वर खाली असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील विशिष्ट पिसांमुळे कानाकडे आवाज केंद्रित होतो. त्यामुळे आवाज कोठून येतो, हे त्यांची ती तिची समानता दिशा नसून आवाजाचा स्त्रोत किती वर खाली आहे याचा त्यांना अंदाज येतो.
डोळे हे इतर पक्षांप्रमाणे कडेला नसून समोरच्या दिशेला विस्तारलेले असतात म्हणून ते एकाच क्षणी दोन्ही डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहू शकतात परंतु माणसाचे डोळे जसे खोबरेत फिरतात तसेच घुबडचे डोळे फिरत नाही. एखादी हलणारी वस्तू पाहायची असेल तर त्यांना डोके फिरवावे लागते. घुबड जेव्हा एखाद्या भक्षावर झपाट घालते तेव्हा त्याचे डोळे पापण्यांनी झाकले जातात. त्यामुळे डोळ्यांना सहसा इजा होत नाही. त्यांची चोच ही खूपच मजबूत असते व वाकलेली असते.
पाय मजबूत बोटांवर तीक्ष्ण अशा नख्या असतात. त्यांच्या डोक्यावर पिसांचा तुरा असतो त्याला शृंगे असे म्हणतात. त्यांच्या शरीरावरील लांब मऊ व हलके पीसे असतात. मादी हे नराहून आकाराने थोडी मोठी असते. घुबड हे पक्षी रात्रीच्या वेळी शिकार करतात, त्यांना रात्री सर्व स्पष्टपणे दिसते.
घुबड या पक्षाचा प्रजनन काळ
घुबड या पक्षांचा विधीचा हंगाम हा निश्चित नसतो. हे पक्षी स्वतः घरटे बांधत नाही. दुसऱ्यांच्या घरट्याचा वापर करतात. घुबडांची मादी ही एका वेळेस दोन किंवा चार अंडी घालतात परंतु काही जातींमध्ये 12 अंडी सुद्धा घातले जातात. यांचे अंडी आकाराने गोल व पांढऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या जातीमध्ये मादी अंडी उबवते.
नर मादीसाठी व पिल्लांसाठी अन्न गोळा करतात. पिल्ले चार ते पाच आठवड्या घरट्यात राहतात. त्यानंतर नर व मादी दोघेही पिल्लांचे संरक्षण करतात व त्यांना खाऊ घालतात. घरट्यातून बाहेर पडल्यानंतर पिल्ले काही आठवड्यात त्यांच्या पालकांवर अवलंबून राहून त्यानंतर पिल्ले उडायला शिकल्यानंतर स्वतः शिकार करतात.
घुबड या पक्षाचे प्रकार
गव्हाणी घुबड : गव्हाणी ही प्रजाती जगात सर्वात जास्त आढळून येते. हे पक्षी ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश तसेच आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया व पॅसिफिक महासागरातील काही प्रदेश सोडले तर हे पक्षी जगातील बऱ्याच प्रदेशांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येतात. या पक्षांना मराठी मध्ये छोटे घुबड म्हणूनही ओळखले जाते. या पक्षाची लांबी 36 सेंटीमीटर असून त्याच्या पाठीकडून सोनेरी बदामी आणि राखाडी रंगाचा, काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.
पोटाकडे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक व गळत तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. यांचे डोके गोलसर आकाराचे व काहीसे माकडासारखे दिसते. चेहऱ्याचा रंग बदामी पांढरा आणि चोच बागदार असते. नर व मादी दोघेही दिसायला या मध्ये सारखेच असतात. यांच्या आहारामध्ये घुशी, सरडे, पाली, उंदीर यांचा समावेश असतो. तर या पक्षांचा प्रजनन काळ हा निश्चित नसतो. त्यांची मादी पांढऱ्या रंगाची गोलसर चार ते सात अंडी देते.
पिंगळा : पिंगळा हा घुबडांच्या प्रजातीतील एक पक्षी आहे. हे जो भारतीय घुबड जातीच्या पक्षांपैकी आकाराने सर्वात लहान असतो. हे मानवी वसाहती जवळ राहणे पसंत करतात. हे पक्षी साधारणता 21 सेमी लांब असून त्यांचा रंग करडा तपकिरी असतो व त्यावर पांढरे ठिपके असतात.
या घुबडाला ठिपके वाली घुबड या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्याच्या मानेवर पांढऱ्या तुटक रेषा असतात. त्यांची चोच बाकदार शिकार पकडण्यासाठी महत्त्वाची ठरते. यांच्यामध्ये नर व मादी दोघेही दिसायला सारखे असतात. हे पक्षी त्यांच्या खाद्यामध्ये बेंडूक, लहान पक्षी पाली, उंदीर इत्यादी छोटी प्राणी खातात. यांची मादी तीन ते चार पांढऱ्या रंगाचे अंडे देते.
शृंगी घुबड : शृंगी घुबड या पक्षाचा समावेश हा ट्रायफिजीफार्मसी या गणाच्या स्ट्राजिडी या कुडामध्ये होतो. ही पक्षी पश्चिम बंगालमधील मुख्य असून हिमालयापासून भारतामध्ये संपूर्ण आढळून येतात. हे घुबड आपल्याला एकटे किंवा जोडीने पाहायला मिळतात. त्यांच्या शरीरावर तपकिरी करडे रंगाची पिसे असतात. शृंगी घुबडाची लांबी 60 ते 56 सेंटीमीटर असून त्यांची उंची हे 48 ते 56 सेंमी असते.
एक किलोग्रॅम ते दोन किलोग्राम पर्यंत असते. नर व मादी दिसायला दोघे ही सारखेच असतात. मात्र मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. त्यांचे डोळे मोठे गोलाकार नारंगी पिवळसर असतात किंवा नारंगी लाल सुद्धा असतात. त्यांच्या डोळ्याभोवती वाटोळ्या तबकडी सारखे वलय असते आणि त्यांच्या काठावर काळ्यापिसांची झाल असते. त्यामुळे ते रात्री सुद्धा पाहू शकतात. मात्र त्यांना जवळचे स्पष्टपणे दिसत नाही.
निष्कर्ष
घुबड हा पक्षी शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी आहे कारण पिकांची नासाधूस करणारे उंदीर, घूस, ससे यांना घुबडे पकडतात त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. आपण घुबड या पक्षांची शिकार थांबवली पाहिजे.
FAQ
घुबड हा पक्षी कोठे राहतो?
घुबड हे पक्षी झाडांच्या ढोलीत, कडेकपारी मध्ये किंवा जमिनीतील बिळांमध्ये राहतात.
घुबड या पक्षाचा आहार काय असतो?
घुबड या पक्षाचा आहार म्हणजे उंदीर, संस्थन प्राणी, छोटे पक्षी, मासे इत्यादी.
भारतात मुख्यतः घुबड कोठे आढळतो?
भारताच्या हिमालय आणि ईशान्य भागात.
घुबड पक्षी कोणत्या कुळात येतो?
स्ट्रायजिडी, टायटोजिडी.
घुबड या पक्षाचा रंग कोणता असतो?
तपकिरी- करडा -काळा.