पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

By आकाश लोणारे

Published On:

Follow Us

Parrot Bird Information In Marathi पोपट हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा एक बुद्धिमान पक्षी असून त्याला शिकवल्यास मानवी भाषा सुद्धा शिकता येते. त्याला मिट्टू या नावाने सुद्धा ओळखले जाते. पोपटांच्या अनेक प्रजाती आहेत, त्यातील काही पोपटाच्या प्रजाती ह्या नष्ट सुद्धा झालेले आहेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. याला इंग्रजी भाषेमध्ये पॅरोट असे म्हणतात.

Parrot Bird Information In Marathi

पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

पोपटाच्या अनेक प्रजाती रंगबिरंगी असून त्या संपूर्ण जगभरात आढळून येतात. हा पक्षी मध्यम आकाराचा असतो तसेच त्याचे वजनही वाजवी असते तसेच त्याच्या आकार व प्रकारावरून आपल्या लक्षात लगेच येईल की तो कोणत्या प्रजातीचा पोपट आहे. हे पक्षी खूप बुद्धिमान व समजदार असतात. कोणतीही गोष्ट इतर पक्षाच्या तुलनेमध्ये हे लवकर शिकतात. मनुष्य प्रमाणे सुद्धा बोलणे शिकू शकतात. पोपटाच्या 372 प्रजाती आढळून येतात, त्यापैकी भारतात सुद्धा काही प्रजाती आढळून येतात.

पक्षाचे नावपोपट
आयुष्य30 ते 40 वर्ष
एकूण जाती372

पोपट हा पक्षी कुठे राहतो :

पोपट हे पक्षी हवामान उदार असेल अशा प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यातील काही प्रजाती ह्या थंड हवामानामध्ये सुद्धा राहतात. पोपट हे पक्षी झाडावर घरटे करून किंवा झाडांच्या ढोलीमध्ये किंवा भोकात तसेच भिंतीमधील धोकांमध्ये तर कधी खडकांच्या कपारी मध्ये पोपट आपली घरटी बनवितात.

पोपट पक्षाचा आहार :

पोपट हे पक्षी सहसा शाकाहारीच आहेत, त्या व्यतिरिक्त ते फळे,बिया, धान्य, मिरची, पाने, आंबा, पेरू इत्यादी फळे खातात तसेच हे पक्षी छोटे कीटक सुद्धा खातात. आपण पाळीव पोपटाला वेगवेगळ्या प्रकारचे फळे मिरची आवडीने खायला देतो. त्याचप्रमाणे तो खातो सुद्धा बऱ्याच पोपटांमध्ये केवळ फळेच प्रिय नाहीत तर हे पक्षी फळभाज्या सुद्धा मोठ्या आवडीने खातात.

Parrot Bird Information In Marathi

पोपट या पक्षाचे वर्णन :

पोपट या पक्षामध्ये विविध रंगाचे व आकारमानाचे पक्षी आपल्याला दिसतात. प्रजातीनुसार त्यांच्यामध्ये विविधता आपण जाणू शकतो परंतु त्यांची शारीरिक रचना ही एकसारखीच असते. त्याची लांबी 10cm पासून ते 100 cm पर्यंत असून चोच आखूड, मजबूत व बागदार असते.

चोचीच्या वरचा भाग कवटीला जोडलेला असून तो हलविता येतो. मानव शरीर आटोपशीर असल्यामुळे हा गोंडस किंवा स्थूल दिसतो. पोपटाच्या पायांच्या चार बोटापैकी दोन बोटे पुढे व दोन मागे असतात. त्यावर बारीक खवले असतात, त्याच्या साहाय्याने कोणतेही खाद्यपदार्थ पायामध्ये धरून चोचीने खातो असतो तर काही हिरव्या रंगाचे पोपट सुद्धा असतात; परंतु बऱ्याच प्रजाती आपण पाहिल्या तर रंगीबिरंगी आपल्याला त्या दिसतात.

त्यामध्ये लाल हिरवा निळा पिवळा आणि काळा इत्यादी रंग असतात. नर व मादी यांचे रंग मात्र सारखेच असतात. पोपट हे जमिनीवर सुद्धा उतरतात परंतु जरुरत पडेल तेव्हा ते झाडांवर चढून बसू शकतात तसेच त्यांची घरटी सुद्धा झाडांवरच करतात.

पोपट या पक्षाचा प्रजनन काळ :

पोपट हे पक्षी जोडीने राहतात. पोपटांनी घरटे तयार केल्यानंतर मादी दर वेळेस दोन ते पाच अंडी घालते. ही अंडी छोटी आणि पांढऱ्या रंगाचे असतात. सर्वसाधारणतः तीन आठवड्यानंतर ही अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती केवळ मासाच्या गोळ्या सारखे असतात तसेच त्यांचे संगोपन व संरक्षण नर व मादी दोघेही करतात तसेच त्या पिल्लांना अर्धवटपचलेले शाखाअन्न भरवतात. पोपटाचे आयुष्य हे 30 ते 40 वर्ष असते तर काही प्रजातींमध्ये 80 वर्षापर्यंत सुद्धा पोपट जगण्याची नोंद आहे.

पोपट या पक्षाचे प्रकार :

काकारिकी पोपट : या प्रजातीचे पक्षी हे न्युझीलँडमध्ये आढळून येतात तसेच हे खूप मजेदार आणि मनोरंजक असतात तसेच खोडकर वृत्तीचे असून ते हुशार असतात. या प्रजातीचे पोपट शिकण्यासाठी आणि घरातील सदस्यांसाठी त्यांच्या आवडत्या गाण्यांमध्ये आवाजाचे नक्कल करतात.

राघू : ही एक भारतातील पोपटाची जात आहे. हे पक्षी जेथे मोठ्या प्रमाणात घनदाट वृक्ष आहेत तेथे राहणे पसंत करतात. मनुष्यवस्थेतील मोठी झाडे बागा आणि आसपासची शेती यावर हे पक्षी निर्भर राहतात. हे पक्षी साधारणता कबुतरा एवढे असतात. त्याचा वरचा रंग गवती हिरवा तर खालच्या बाजूला फिकट हिरवा तसेच त्याची चोच ही लाल रंगाची व आकुड असते.

मजबूत वाकडी चोच, डोके मोठे मानेच्या भोवती गुलाबी कळे असून पुढच्या बाजूला ते काळ्या पट्ट्याने चोचीच्या बुडाला जोडलेले असते. खांद्यावर एक तांबडा पट्टा व त्याचे शेपूट लांबट टोकदार असते. मादीच्या मानेभोवती गुलाबी वलय नसते.

आफ्रिकन ग्रे पोपट : या प्रजातीच्या पोपटाचा रंग हा राखाडी रंगाचा असून त्याचा आकार तेवढे सेंटीमीटर असते तसेच त्याचे प्रिय नाव हे कांगो आफ्रिकन ग्रे पोपट असे आहे. या प्रजातीच्या पोपटाचा अधिवास जास्तीत जास्त पश्चिममध्ये आफ्रिकेमध्ये असूनही दिसायला सुंदर तसेच हुशार पोपट असतात. हे पक्षी भाषा लवकर शिकतात. त्यांचे आयुष्य 40 ते 50 वर्ष असतात तसेच हे पोपट बिया, नट, फळे, बेरी इत्यादी खातात.

मॅकाव : हे पोपट आकाराने इतर पोपटाच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. हे पोपट दिसायला अतिशय सुंदर व रंगबिरंगी दिसतो तसेच हा पोपट मानवी भाषेचे अनुकरण लगेच करतो तसेच खूपच हुशार आणि बुद्धिमान पक्षी आहे.

मेयर पोपट : मेयर प्रजातीचे पक्षी आफ्रिकेमध्ये आढळून येतात. ही प्रजाती त्यांच्या कुटुंबामध्ये मिसळलेले असते परंतु लोकांचे लक्ष वेधून घेण्यामध्ये या पक्षाला फारसा रस नसतो. मेयरचा पोपट हा शांत आणि हुशार पोपट आहे.

ॲमेझॉन पोपट : हे पोपटाच्या प्रजाती मुख्यतः वेस्टइंडीज, मिस्कीको आणि उत्तर दक्षिण अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ॲमेझॉन पोपटाची वैशिष्ट्य म्हणजे की तो त्याच्या मालकासोबत खूप लवकर मिसळतो. हा पोपट जर तुम्हाला पाळायचं असेल तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. याचा रंग हिरवा असतो तसेच त्याची लांबी 12 cm असते. निवासस्थान त्याचे जंगलांमध्ये असते तसेच हे पक्षी फळे, बिया इत्यादी खातात. त्यांचे आयुष्य 35 ते 50 वर्षापर्यंत असते.

निष्कर्ष :

पोपट या पक्षांच्या विविध प्रजाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून आपण त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे तसेच या पक्षांना नामशेष होण्यापासून वाचवले पाहिजे. पोपट नामशेष होण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे झालेली वृक्षतोड. जंगलांमध्ये वृक्षत नसेल तर ही पक्षी आपली घरटे आणि पिल्ले तसेच त्यांची कुटुंबे कोठे राहतील. त्यांना शिकाऱ्यापासून धोका निर्माण होतो. त्यांना अन्न आणि जागेसाठी अतोनात प्रयत्न सुद्धा करावे लागतात.

FAQ

पोपट हे पक्षी कोठे राहतात?

हे पक्षी खडकांच्या कपारी झाडांच्या ढोलीत आपली घरटी बनवतात.

भारतामध्ये सर्वात जास्त पोपट कोणत्या प्रदेशात आढळतात?

भारतात सर्वात जास्त पोपटांची संख्या ही नैऋत्य भागात आढळते.

पोपट किती वर्ष जगतात?

पोपट तीस ते चाळीस वर्षापर्यंत जगतात.

लहान पोपटांना काय म्हणतात?

लहान पोपटांना पिग्मी पोपट असे म्हणतात जी सर्वात लहान प्रजाती आहे.

पोपट हे पक्षी किती दिवसांमध्ये उडतात?

पोपट हे पक्षी जन्माच्या चार ते पाच आठवड्यात उडण्यात सक्षम होतात.

Was this article helpful?
YesNo

आकाश लोणारे

माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी, लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

Leave a Comment