Partridge Bird Information In Marathi तीतर हा पक्षी अतिशय जलद वेगाने धावणारा आणि उडणारा पक्षी आहे. हा एक मध्यम आकाराचा तसेच कोंबडी सारखा दिसणारा पक्षी आहे. या पक्षाचा समावेश हा फ्रॅकोलायनस या प्रजातीमध्ये होतो. ह्या प्रजाती जगभर आढळून येतात तसेच या पक्षाच्या एकूण 40 जाती असून त्यातील पाच जाती ह्या आशियामध्ये तर उर्वरित जाती आफ्रिकेमध्ये आढळून येतात.

तितर पक्षाची संपूर्ण माहिती Partridge Bird Information In Marathi
भारतामध्ये करडा तितर, काळा तीतर आणि रंगीबिरंगी तीतर ह्या तीन प्रजाती आढळून येतात. त्यापैकी करड्या रंगाचा तीतर पक्षी भारतात सर्वत्र आढळून येतो. काळा तीतर हा उत्तर प्रदेश, आसाम आणि रंगीबिरंगी ती तर हा राजस्थान व उत्तर प्रदेश तसेच दक्षिणेकडे आढळतो.
पक्षी | तितर |
आढळ | जंगले |
लांबी | 29 ते 34 cm |
रंग | तपकिरी करडा |
उपयोग | मास मिळवण्यासाठी |
तितर हा पक्षी कुठे राहतो :
तीतर हा पक्षी उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळून येतो त्याव्यतिरिक्त भारत चीन कंबोडिया होंग कोंग लाऊस म्यानमार थायलंड व्हिएतनामा येथे सुद्धा मी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तीतर हे पक्षी जमिनीवर राहतात तसेच झाडाझुडपांमध्ये करतात. काटेरी झुडपांच्या मोकळ्या प्रदेशात किंवा शेताच्या आसपास आजूबाजूला एखाद्या खड्डा करून त्यामध्ये गवत पसरवून मादी अंडी घालते.
तितर पक्षाचा आहार :
तीतर हे पक्षी धान्याचे दाणे, बिया, वाळव्या, शेणखिडे वेचून खातात. त्या व्यतिरिक्त ढाल कीटक सुद्धा वेचून खातात.
तितर या पक्षाचे वर्णन :
तीतर या पक्षामध्ये त्याच्या जातीनुसार आपल्याला विविधता पाहायला मिळते तसेच त्याच्या आकार व रंगतमध्ये सुद्धा फरक जाणवतो. तीतर या पक्षाची लांबी 29 ते 34 सेंटीमीटर पर्यंत असते तसेच त्याच्या पाठीचा रंग हा करडा तपकिरी असतो व त्यामध्ये तांबूस रंगाच्या छटा असतात.

पोटाकडचा भाग पिवळसर असून त्यावर गळत तपकिरी नागमोडी आकाराच्या रेषा असतात. या पक्षाचे शेपूट आखूड तसेच काळसर व तांबूस रंगाचे असते. तसेच त्याची हनुवटी, गळा आणि कपाळ हे केशरी रंगाचे असते.
त्याच्या गळ्यावर चंद्रकोरी सारखा एक आडवा पट्टा असून त्याची चोच काळसर व पाय मळकट तांबड्या रंगाचे असतात. नर व मादी हे दिसायला सारखेच असतात. त्याच्या पायाचे नख्या कोंबडीचे नखांप्रमाणेच टोकदार असतात. तितराचे लहान लहान थवे असून ते माळराने, गवताळ प्रदेश व काटेरी झुडपांमध्ये तसेच शेतामध्ये वावर करतात.
हे पक्षी दाट वने पाणथळ जागा अशा ठिकाणी सुद्धा क्वचित प्रमाणात राहतात. छोट्या थव्यांमध्ये हे पक्षी राहून ज्याप्रमाणे कोंबड्या आपल्या पायांनी माती उकरून वाढवी, कीटक, अळ्या खातात तसेच या पक्षांना माणसाची किंवा शिकाऱ्याची चाहूल येताच ते भुरकन असा आवाज करीत दूरवर उडतात परंतु हे पक्षी खूप दूर उडू शकत नाहीत.
तितर या पक्षाचा प्रजनन काळ :
तीतर हे पक्षी दिवसा जमिनीवर राहतात तर रात्रीच्या वेळी ते बाभळी किंवा शिशवीच्या झाडांवर आपले जीवन व्यतीत करतात. त्यांच्या विनीचा हंगाम हा ठराविक नसला तरी सुद्धा मादी झुडपाच्या आडोशाला जमिनीमध्ये छोटेसे खड्डा करून त्यामध्ये गवताचे छोटेसे घरटे करून सहा ते आठ फिकट पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची अंडी घालतात.
ही पिल्ले एका वर्षामध्ये प्रजननक्षम होतात. या पक्षाचे आयुष्य हे किमान आठ वर्ष असते. तितराचे मांस रुचकर लागते, त्यामुळे बाजारामध्ये चित्रांना चांगली मागणी असते तसेच चित्राचे अंडी सुद्धा खाल्ली जातात.
तितर या पक्षाचे प्रकार :
तीतर या पक्षाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात त्यामध्ये करडात इतर काळात इतर आणि रंगीबिरंगी तीतर. त्यामध्ये काही उपप्रकार पडतात.
चित्ता तितर : चित्रांची ही प्रजाती पश्चिम आशियामध्ये आशिया तसेच भारतीय उपमहाद्वीप आणि दक्षिण पूर्व आशिया येथे आढळून येते.
काळा तीतर : काळ्या रंगाची तितराचे डोकेही वक्र असून त्याच्या बुबडाचा रंग हा तपकिरी असतो तसेच त्याच्या शरीराची लांबी 33 ते 36 सेंटीमीटर असते. त्याचे वजन 450 ग्रॅम पर्यंत असते. या चित्राचा रंग काळा असून त्याची छाती काळी, लाल पोट व पांढरे ठिपके आणि पाठीवर सोनेरी तपकिरी डाग असतात. त्याचे पंख गोलाकार असून शेपटीवर पांढरे काळे पट्टे असतात. यांचा प्रजनन काळ हा एप्रिल ते जून असतो मादी एका वेळेला आठ ते बारा अंडी घालते.
करडा तितर : हा ती तर साधारणतः 60 सेंटिमीटर आकाराच्या असून त्याचा रंग तपकिरी आहे तसेच त्याच्या अंगावर ठिपके रेषा व पट्टे याचा मिश्रण असते. त्याचे शेपूट आखूड असते. या पक्षाच्या शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो तसेच नर मादी दिसायला सारखेच असतात घराच्या दोन्ही पायावर छोट्या आकाराची नखे असलेली बोटे असतात. त्याने पडताना त्यांना उपयोग होतो. ही तितराची प्रजाती झाडांच्या झुडपांमध्ये किंवा शेतीच्या झाडा-झुडपांमध्ये राहतात. यांची मादी चार ते आठ अंडी घालते.
राम तितर : या तितराला पांढरा तितर किंवा गोरा तितर या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही एक भारतीय उपखंड आणि इराणमध्ये आढळणारी तितराची एक प्रजाती आहे. हा एक लहान आकाराचा तीतर सारखाच दिसणारा पक्षी असून नर व मादी यामध्ये आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. नराच्या गोठ्यात एक फुगवटा असतो आणि कधी कधी दोन फुगे असतात परंतु मादीला ते नसतात. हा चमकदार रंगाचा पक्षी असून त्याच्या शरीरावर व शेपटीवर पांढरे-काळे गडद तपकिरी आणि हलके तपकिरी पट्टे असतात.
चिनी तीतर : हे भारत आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळणारी तितराची एक जाती आहे. ही मुख्यता कोरड्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळून येतात तसेच वलसर जंगलात सुद्धा हे राहतात. त्यांची लांबी 30 ते 34 सेंटीमीटर असून वजन 280 ते 400 ग्रॅम पर्यंत असते.
निष्कर्ष :
तीतर हा पक्षी पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जो अळ्या, कीटक, वाळवी यांचे संतुलन ठेवतो. या पक्षाची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे तसेच वनांचे मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाल्यामुळे त्यांची संख्या धोक्यात येत आहे. त्यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
FAQ
चिनी तिथर कोठे आढळून येतो?
चिनी तीतर हा चीन, भारत, हॉंगकॉंग, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड येथे आढळून येतो.
तीतर हे पक्षी इतर पक्षांप्रमाणे दूर उडू शकतात का?
तीतर हे पक्षी जास्त दूर उडू शकत नाही.
तीतर हे पक्षी काय खातात?
तीतर हे पक्षी बिया, पाने, बेरी तसेच कीटक खातात.
तीतर हे पक्षी कोठे राहतात?
तीतर हे पक्षी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडांच्या झुडपात तसेच शेतातील झुडपात राहतात.
तीतर पक्षी किती अंडी देतात?
तीतर हे पक्षी सहा ते दहा अंडी देतात.