Peacock Bird Information In Marathi मोर हा पक्षी आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये अधिक शोभा वाढवण्यासाठी मोर हे नेहमी नृत्य करत असतात. तसेच मोर ओरडतात. त्यांचा नृत्य आणि आवाज खूपच सुंदर असते. मोरांचा पिसारा खुलल्यानंतर तर अधिकच आकर्षक वाटतो. तसेच मोराच्या डोक्यावर तुरा असतो.

मोर पक्षाची संपूर्ण माहिती Peacock Bird Information In Marathi
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे. मोराच्या काही प्रजाती आढळून येतात. त्या भारताशिवाय इतर देशात सुद्धा आहेत. मोर या पक्षाचे वर्णन आपण शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचे वर्णन अपुरेच राहते. एवढे आकर्षक हा पक्ष असतो. मोर या पक्षाला हिंदू धर्मात सुद्धा महत्त्व आहे. मोर या पक्षाच्या सुंदरतेच्या अनेक कविता आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहोत. हा पक्षी फॅजीऍनिडी या कुळामध्ये येते.
पक्षाचे नाव | मोर |
कुळ | फॅजीऍनिडी |
मोराचे वजन | भारतीय मोर चार ते सहा किलोग्रॅम |
लांबी | 100 ते 120 cm |
आयुष्य | 15 वर्षे |
मोर हा पक्षी कोठे राहतो?
मोर हे पक्षी साधारणता आपल्याला थव्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या थव्यामध्ये एक मोर आणि तीन ते चार लांडोरी असतात. मोर हे पक्षी साधारणता पानझडीच्या जंगलांमध्ये शेतांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पक्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना नदीकिनारी तसेच थंड वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे ते थंड प्रदेशात आढळून येतात. मोर हे पक्षी रात्री झाडावर झोपतात.

भारतीय मोर हे भारतीय उपखंडात सर्वत्र आढळून येतात तसेच श्रीलंकेच्या सखल भागात सुद्धा आढळून येतात. भारतातील बऱ्याच भागांमध्ये मोर या पक्षाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यांना आदर व संरक्षण सुद्धा लाभलेले आहे. त्या व्यतिरिक्त मोर हे पक्षी युनायटेड स्टेट्स, कोलंबिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, स्पेन, पोर्तुगाल, गयाना, न्यूझीलंड, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया, क्रोसिया आणि लोकरम बेट तसेच क्रोएशिया येथे सुद्धा आढळून येतात.
मोर या पक्षाचा आहार :
मोर हे पक्षी सर्व भक्षी पक्षी आहेत, ते सरडे, साप, झाडांची कोवळी पाने तसेच इतर धान्य व कीटक सुद्धा खातात.
मोर या पक्षाचे वर्णन :
मोर हा पक्षी साधारणतः मोठ्या आकाराचा पक्षी आहे मोराची लांबी 100 ते 155 सेंटिमीटर पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या मोराच्या पिसाऱ्याच्या शेवटी 195 ते 225 सेंटिमीटर एवढी त्याची लांबी असते. मोर या पक्षाचे वजन तीन ते चार किलो पर्यंत असते.
भारतीय मोराचा आपण विचार केला तर भारतीय मोर हे फासीयांनीडी कुळातील असून ते सर्वात वजनदार व आकाराने मोठे आहेत. हिरव्या रंगाच्या मोराचा भारतीय प्रजातीच्या निळा मोराच्या नरापेक्षा पिसारा लांब असतो. त्याच्या शरीराचा आकार रंग आणि सूर्याचा आकार अतिशय आकर्षक असतो. नर मोराच्या डोक्यावरील तुरा हा निळसर रंगाचा असतो.
डोक्यावरील पंख लहान आणि कुरडे असतात. मादी मोरांना तपकिरी रंगाची पिसे आणि थोडीशी हिरव्या रंगाची पिसे असतात. मोराच्या डोळ्याच्या वर एक पांढरा पट्टा आणि डोळ्याखाली चंद्रकोर आकाराचा पांढरा ठिपका असतो. तर मोराच्या मानेच्या पुढचा भाग हा आणि पंख गडद पट्टेदार राहतो. मोराच्या पिसाऱ्याची पंखांची संख्या 200 पेक्षा जास्त असते. त्याच्या डोळ्याच्या आकारात सर्व पिसे जवळजवळ असतात. शेपटीच्या खाली काळ्या रंगाची गडद तकतकीत हिरवी छटा असते.
मोर या पक्षाचा प्रजनन काळ :
मोर या पक्षाला भारतामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तसेच भारतीय देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. जेव्हा विनीचा हंगाम येतो तेव्हा त्याचा पिसारा झडून जातो. यांचा विनीचा हंगाम हा पावसाळ्यामध्ये सुरू होतो म्हणजेच पावसाळ्याची सुरुवात ही मे महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत होत असते. त्यामुळे शेवटपर्यंत पिसारा फुलवून हे मोर नाचत असतात तसेच जंगलांमध्ये झाडांच्या आसपास आपल्याला मोर नाचताना दिसतात.
भारतामध्ये इतर भागांमध्ये तर मोर अंगणामध्ये सहजतेने आपल्याला वावरताना सुद्धा दिसतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोर हे मनुष्यवस्तीपाशी राहतात परंतु मोर हे मानवापासून दूरच राहणे पसंत करतात. या काळामध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी मोर आपला पिसारा फुलवतो व नाचतो. त्याच्या या आकर्षक नृत्यामुळे आणि दिसणाऱ्या रंगछटांमुळे मादी मोराकडे आकर्षित होते.
मोर या पक्षाचे प्रकार :
मोर या पक्षाचे साधारणता तीन प्रकार पडतात.
इंडियन पिंफॉल मोर : इंडियन पिंफॉल या मोराला सामान्यतः मोर किंवा निळ्या रंगाचा मोर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा मोर भारतीय उपखंडात आढळतो. हे त्यांचे माहेरघर आहे. या प्रकारचा मोर तुम्हाला भारतामध्ये सगळीकडेच पाहायला मिळतो आणि याच जातीचा मोर हा भारतीय राष्ट्रीय पक्षी आहे. या मोराची जात ही श्रीलंका दक्षिण आशियाई आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा आढळते.
या जातीच्या मोराचा रंग हा निळा आणि हिरवट असतो तसेच त्याची मान लांब असते. त्याच्या डोक्यावर एक तुरा असतो, लांब आणि आकर्षक असा त्याचा पिसारा असतो. हे मोर सुद्धा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नृत्य करतात आणि मादी मोरांपेक्षा दिसायला वेगळी असते. त्यामुळे आपण चटकन ओळखू शकतो.
कांगो पिंफॉल मोर : ही मोराची प्रजाती आफ्रिकन पिंफॉल या नावाने सुद्धा ओळखली जाते. हा मोर सुद्धा आकाराने एका मोठ्या पक्षाप्रमाणे आहे. यांचे पंख हे हिरवे आणि वायलेट रंगाचे असतात तसेच या मोराची मान ही लाल रंगाची असून राखाडी पाय असतात. 14 पंख असलेल्या एक काळी शेपूट सुद्धा त्याला असते आणि मुकुट उभ्या पांढऱ्या लांबला जर केसांसारख्या पंखांनी अतिशय आकर्षक दिसते. या प्रजातीच्या मोराची पाठ ही हिरव्या रंगाची तसेच तपकिरी रंगाची छाती असते आणि काळ्या रंगाचे त्याचे पोट असते, हे पक्षी दिसायला लागतात.
ग्रीन पिंफॉल मोर : ग्रीन पिंफॉल हे मोर उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहणे खूप पसंत करतात. या प्रकारचे मोर हे दक्षिण आशिया मध्ये तर मोठ्या प्रमाणात आढळतात. या मोराचे आता अस्तित्व मात्र धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे या मोरांची संख्या दिवसेंदिवस खूप घटत आहे. या मोराची प्रजाती दिसायला भारतीय मोरासारखेच असते परंतु या मोराचा रंग हिरवट असून यांची नर आणि मादी दिसायला मात्र एकसारखेच असतात. या पक्षाचे वजन चार ते सहा किलो असून त्याची लांबी 1.8 ते 3 मीटर पर्यंत असते.
निष्कर्ष :
मोर हा पक्षी दिसायला सुंदर आकर्षक व मनमोहक असा आहे. तसेच आपण मोर या पक्षाचे संरक्षण केले पाहिजे. मोराविषयी बोलायचे झाले तर मोर हा हिंदू धर्माशी संबंधित आहे. हिंदू धर्मातील अनेक देवी-देवतांशी मोर संबंधित आहे. त्यामुळे समाजामध्ये मोराला विशिष्ट असे स्थान त्यांना प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मामध्ये परोपकार, संयम, दया, करुणा तसेच ज्ञान या पक्षाच्या आचरणावरून आपल्याला कळते. त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे.
FAQ
मोर हा पक्षी कोठे राहतो?
मोर हा पक्षी जंगलात किंवा लागवडी खालील असलेल्या जमिनीवर राहतात. तेथील ते शेंगा फळे धान्याचे बीज याशिवाय ते सरडे, साप, छोटे छोटे सरपटणारे प्राणी सुद्धा खातात.
भारतामध्ये मोराच्या कोणत्या प्रजाती आढळतात?
भारतामध्ये निळा मोर आणि हिरवा मोर अशा दोन प्रजाती आढळतात.
मोरांना किती पिसे असतात?
मोरांना 200 किंवा त्यापेक्षा जास्त पिसे असतात.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे?
भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे.
मोर हा कशाची प्रतीक आहे?
भारतातील मोर हा सौंदर्य, कृपा आणि अभिमानाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील अनेक देवी देवतांची संबंधित आहे.