Spotted Owlet Information In Marathi पिंगळा हा पक्षी घुबड जातीतील सर्वात लहान पक्षी आहे. हे पक्षी मानवी वस्तीजवळ राहणे पसंत करतात. त्यामुळे हे पक्षी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. हे पक्षी भारतात सगळीकडे पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशांमध्ये सुद्धा आढळून येतो.

पिंगळा पक्षाची संपूर्ण माहिती Spotted Owlet Information In Marathi
या पक्षांचा रंग आणि आकारावरून तीन उपजाती आढळून येतात. हे पक्षी सुद्धा निशाचर पक्षी आहेत. हे पक्षी दिवसा जुन्या झाडांच्या डोलीत किंवा मोठ्या घरातील छताच्या आश्रयाने राहतात. हे पक्षी घनदाट वृक्षांच्या परिसरांमध्ये कमी राहतात. या पक्षांविषयी भारतीय समाजात बरेच अंधश्रद्धा आहेत. या पक्षांविषयी असे म्हटले जाते की, हे पक्षी दिसणे अशुभ आहेत किंवा यांचा कर्कश आवाज अशुभ आहे. तसेच हा पक्षी घरातील मृत्यूची पूर्वकल्पना देतो असा सुद्धा गैरसमज आहे परंतु असे काही नाही. हिंदू संस्कृतीतील श्रध्येप्रमाणे पिंगळा आहे. माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते.
पक्षाचे नाव | पिंगळा |
इंग्रजी नाव | Spotted Owlet |
कुळ | स्ट्रायजिडी |
शास्त्रीय नाव | अथिनी ब्रामा |
रंग | करडा, तपकिरी, पांढरा |
आयुष्य | 16-17 वर्ष |
लांबी | 21cm |
पिंगळा हा पक्षी कुठे राहतो :
पिंगळा हा पक्षी भारतात सगळीकडे पाहायला मिळतो. त्या व्यतिरिक्त बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशांमध्ये सुद्धा आढळून येतो. या पक्षांचा रंग आणि आकारावरून तीन उपजाती आढळून येतात. हे पक्षी सुद्धा निशाचर पक्षी आहेत. हे पक्षी दिवसा जुन्या झाडांच्या डोलीत किंवा मोठ्या घरातील छताच्या आश्रयाने राहतात. हे पक्षी घनदाट वृक्षांच्या परिसरांमध्ये कमी राहतात.
पिंगळा पक्षाचा आहार :
पिंगळा हे पक्षी निशाचर आहेत, हे पक्षी रात्री उंदीर, किडे, घुशी, सरपटणारे, लहान प्राणी, बेडूक या प्राण्यांची शिकार करतात व आपली उपजीविका त्यावर भागवतात. या पक्षांचे मुख्य उंदीर व घूस हे भक्ष असले तरी ते शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त पक्षी आहेत.

पिंगळा या पक्षाचे वर्णन :
पिंगळा हा पक्षी आकाराने साधारणता मैना या पक्ष एवढा असतो तसेच या पक्षांचा मुख्य रंग हा करडा आणि तपकिरी असतो त्यावर पांढऱ्या रंगाची ठिपके असतात. या ठिपक्यावरूनच या पक्षाला ठिपकेवाली घुबळ या नावाने सुद्धा ओळखले जाते. या पक्षांची डोके गोल आणि वाटोळे असते तर मानेवर तुटक अशा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात.
या पक्षाची चोच ही बागदार असते हे पक्षी शिकारी पक्षी आहेत. त्यामुळे त्यांना तशी चोच निसर्गाकडून प्राप्त झालेले आहे. हे पक्षी त्या चोचीचा उपयोग मास फाडण्यासाठी करतात. तर त्या पक्षाचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात नर व मादी दिसायला. या पक्षांमध्ये दोघेही सारखेच असतात.
सर्व घुबडांप्रमाणे येथील सुद्धा त्याची मान दोन्ही बाजूंनी फिरवू शकतो. हे पक्षी एका जागी बसले असतानाही क्षणात त्यामागे काय घडत आहे हे सुद्धा पाहू शकतात. या पक्षांना अंधारामध्ये स्पष्ट दिसते. या पक्षांचे कान सुद्धा उत्कृष्ट असतात, त्यामुळे हे पक्षी आवाजाच्या दिशेने त्यांची मान वळवू शकतात.
पिंगळा या पक्षाचा प्रजनन काळ :
पिंगळा या पक्षांचा प्रजनन काळ हा सामान्यतः नोव्हेंबर ते मार्च एप्रिल असा असतो. या काळामध्ये पिंगळा या पक्षांची विन तयार होते, त्यामुळे हे पक्षी त्यांचे घरटे तयार करतात. या पक्षांचे घरटे हे झाडांच्या ढोली किंवा जुना इमारतींच्या चित्रांमध्ये तसेच कडे कपारीत, छता जवळील जागांमध्ये हे पक्षी मिळेल. त्या साहित्यांमध्ये त्यांचे घरटे तयार करतात.
हे पक्षी दुसऱ्या पक्षांनी सोडून दिलेल्या घरट्यात सुद्धा अंडी घालतात. या पक्षांची मादी तीन ते चार पांढऱ्या रंगाची अंडी घालते. ही अंडी उबविण्यापासून ते संगोपनापर्यंतचे सर्वेच कामे नर व मादी दोघे मिळून करतात.
पिंगळा या पक्षाचे प्रकार :
रानपिंगळा : रानपिंगळा हा पक्षी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. परंतु गेले काही वर्षांमध्ये काही कारणास्तव हे पक्षी दुर्मिळ पक्षी बनले आहेत. या पक्षाचा आकार साधारणता मध्यम असून या पक्षांचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात.
या पक्षाची जोच भागदार आणि शिकार पकडण्यासाठी व मास फाळण्यासाठी असते तर पाठीचा रंग राखाडी व पोटाचा रंग हा पांढऱ्या रंगाचा असतो सर्व घुबडांप्रमाणेच रांग पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी फिरवू शकतो. या पक्षांना सुद्धा अंधारामध्ये स्पष्ट दिसते.
हे पक्षी त्यांच्या कानामुळे अतिशय सूक्ष्म हालचाली सुद्धा ऐकू शकतात. या पक्षांमध्ये नर व मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. रान पिंगळा या पक्षांविषयी भारतामध्ये अंधश्रद्धा बाळगल्या जातात. रानपिंगला दिसणे अशुभ मानले जाते किंवा त्याचा कर्कश आवाज ओरडल्याने त्याला अशुभ मानले जाते; परंतु पश्चिम बंगालमध्ये वनपिंगळा हा महालक्ष्मीचे वाहन मानले जाते.
पट्टेरी पिंगळा : हे पक्षी आशियाई पट्टेरी पिंगळा या नावाने सुद्धा ओळखले जातात. हे पक्षी भारतीय उपखंडातील उत्तर भागांमध्ये राहतात. या पक्षांचे वास्तव्य हे दक्षिण पूर्व आशियाच्या काही भागात तर उत्तर मध्य व पूर्वोत्तर देशांमध्ये सुद्धा आहे. हे पक्षी सुद्धा निशाचर पक्षी आहेत.
निष्कर्ष :
पिंगळा हा पक्षी सुद्धा पर्यावरणाचा समतोल राखणारा पक्षी आहे. हे पक्षी निशाचर आहेत, या पक्षांच्या काही उपजाती आढळून येतात परंतु या पक्षांची संख्या खूपच कमी होत चालली आहे. हे पक्षी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. या पक्षांमुळेच पर्यावरणाचा समतोल राखला जातो कारण शेतामध्ये असलेल्या उंदीर, घूशी ज्या नियमितपणे पिकाची नासाडी करतात.
अशा प्राण्यांची हे पक्षी शिकार करतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. परंतु मानवाने मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यामुळे तेथे वसाहतीकरण निर्माण केले आहे. यामुळेच या पक्षांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही आणि या पक्षांना त्यांना पुरेशी राहण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या पक्षांची संख्या धोक्यात आली आहे. मात्र या पक्षांच्या प्रजातींना अभय देण्यासाठी पक्षी संवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे.
FAQ
पिंगळा या पक्षाचे शास्त्रीय नाव काय आहे?
पिंगळा या पक्षाचे शास्त्रीय नाव Athene Brama असे आहे.
पिंगळा या पक्षाची लांबी किती असते?
पिंगळा या पक्षाची लांबी 21 सेंटिमीटर असते.
पिंगळा या पक्षाचा रंग कोणता असतो?
पिंगळा या पक्षाचा रंग तपकिरी करडा असतो.
पिंगळा या पक्षाचे मादी किती अंडी घालते?
पिंगळा या पक्षाची मादी तीन ते चार पांढऱ्या रंगाची अंडी घालते.
पिंगळा हे पक्षी कोठे आढळून येतात?
पिंगळा हा पक्षी संपूर्ण भारतात आढळून येतो. त्या व्यतिरिक्त हे पक्षी श्रीलंका, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा आढळून येतात.