Swan Bird Information In Marathi हंस हा पक्षी दिसायला अतिशय सुंदर दिसतो. हंसाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला विभिन्न प्रजाती पाहायला मिळतात तसेच हंस या पक्षावर कविता सुद्धा आपल्याला रचलेल्या मिळतात. हंसाच्या मुख्यता दोन प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये काळा हंस आणि पांढऱ्या रंगाचा हंस हे पक्षी दिसायला अतिशय सुंदर व त्यांच्या शरीर रचनेवरून त्यांना विशेष आकर्षण प्राप्त झालेले आहे.

हंस पक्षाची संपूर्ण माहिती Swan Bird Information In Marathi
हंस हे पक्षी अतिशय समजूतदार असून हे पक्षी आफ्रिका, अंटार्टिका वगळता जगाच्या अनेक भागांमध्ये आढळतात. हे पक्षी सहसा शांत प्रिय असून जेव्हा त्यांच्या पिल्लांविषयी प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो आक्रमक सुद्धा होतो.
हंस हे पक्षी अँटीडे या कुडा मधल्या सिग्नस प्रजातीचे पक्षी आहेत. हंस या पक्षाच्या सहा ते सात पोट जाती सुद्धा आढळून येतात. हंस हे आयुष्यभरासाठी एकच त्यांचा साथीदार निवडतात हंसांची मादी ही एका वेळी तीन ते आठ अंडी देतात. हंस हे पक्षी साधारणता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतीय साहित्य कलेत सुद्धा या पक्षाला विशेष स्थान आहे. हंस हा पक्षी विद्येची देवता माता सरस्वती यांचे वाहन सुद्धा आहे.
हंस हा पक्षी कुठे राहतो
हंस हे पक्षी सरोवर, तळे, नद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात, त्यांना असे स्थान प्रिय असते. हंस हे पक्षी नेहमी थंड हवेच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. हंस हे पक्षी भारतीय नसले तरी सुद्धा ते हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच भारतात स्थलांतर करतात. हिमालयाच्या पायथ्याशी हे पक्षी आढळून येतात. मुख्यतः हे पक्षी युरोप आणि सायबेरियामध्ये आढळतात.

हंस पक्षाचा आहार
हंस हा पक्षी साधारणता तलाव, नद्या आणि कालव्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. हे पक्षी सर्वभक्षी असतात. ते फळांच्या बियाबेरी कीटक तसेच हिरवे शेवाळ आणि लहान लहान मासे सुद्धा खातात. त्या व्यतिरिक्त नदी तलावांमध्ये उगवणाऱ्या झाडांना खाण्यामध्ये त्यांची लांब अशी मान नेहमीच मदत करते. याचबरोबर ते वनस्पतींना सुद्धा चिटकून राहणाऱ्या कीटकांना खातात.
हंस या पक्षाचे वर्णन
हंस हा पक्षी मुख्यता पांढऱ्या आणि काड्या रंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काळ्या रंगाचा हंसल हा पक्षी ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो. त्याच्या शरीरावर 25 हजार पेक्षा जास्त पिसे असतात. त्या हंसाची पिसे ही खूप मऊ असतात आणि त्याचा व्यास 3.1 मीटर पर्यंत लांब असतो. हंसाची मान ही सळपातळ आणि लांब असते. हंसाचे तोंड आणि डोळे त्याच्या शरीरानुसार खूपच लहान असतात तसेच हंसाचे पाय हे वल्हे युक्त असतात. ते त्यांना होण्यास मदत करतात.
हंस या पक्षांमध्ये त्यांच्या प्रजातीनुसार आपल्याला आकार व रंगांमध्ये विविधता पाहायला मिळते तसेच त्यांच्या वर्तनातील फरक सुद्धा आपल्याला तेथे जाणवतो. हंस या पक्षाचा आकार देऊन मीटर पर्यंत असू शकतो तर त्याचे वजन हे 15 किलो पर्यंत असू शकते. आमचं या पक्षाचा पंखाचा आकार हा तीन मीटरपर्यंत लांब असतो. हंस हे पक्षी खूप लांबचा प्रवास करतात तसेच माणसं हा पक्षी खूप प्रामाणिक पक्षी आहे. ते नेहमी त्यांच्या एकाच जोडीदारासोबत संपूर्ण जीवन व्यतीत करतात. हंस या पक्षाला दात नसतात तसेच त्याची चोच ही लाल-केशरी किंवा इतर रंगाची सुद्धा असते.
हंस या पक्षाचा प्रजनन काळ
हे पक्षी साधारणता 20 ते 30 वर्ष पर्यंत जीवन जगतात. वेगवेगळ्या जातीमध्ये याविषयी फरक असू शकतो. उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा हंस पक्षी आकाराने सर्वात मोठा असून या पक्षाचा जीवनकाळ हा 24 वर्षापर्यंत असतो. तर म्युट हंस पक्षाचा जीवनकाळ हा 20 वर्षापर्यंत असतो तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आढळणारे हंस पक्षी हे रंगाने काळे असून हे पक्षी सर्वात जास्त म्हणजेच 40 वर्षापर्यंत जीवन जगतात.
हंस हे पक्षी पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहेत. जो मुख्यता झाडांची खोडे, फुलांच्या कळ्या, पाने आणि छोटे फळ सुद्धा खातात. हे पक्षी चार ते सात वर्षांमध्ये प्रौढ होतात आणि आपली जोडी तयार करतात. हंस पक्षांमध्ये नर आणि मादी दोघे एकत्रित येऊन आपले घरटे बांधतात तसेच अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी दोघेही एकत्रित मिळून करतात. एका वेळेला मादी चार ते सात अंडी देते. हे अंडे उगवण्यासाठी त्यांना 34 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. हे पक्षी आपल्या अंड्यांचे आणि घराचे संरक्षण करण्यासाठी कधी कधी आक्रमक सुद्धा होतात.
हंस या पक्षाचे प्रकार
पाक हंस : या हंसाची प्रजाती ही गिधाडापेक्षा थोडी मोठी असून त्यांचा पांढरा रंग असतो तसेच या प्रकारच्या हंसाची मान ही लांब असते व नर्मदी दिसायला सारखेच असते. ही प्रजाती चोच पाण्यामध्ये घालून चरतात. हे पक्षी पाकिस्तान आणि भारताच्या वायव्य दिशेला हिवाळ्यामध्ये भटके पक्षी म्हणून स्थलांतर करतात.
काळा हंस : काळा हंस हा पक्षी मुख्यतः ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याव्यतिरिक्त हा पक्षी दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा आढळतो. या पक्षाचे जीवन काळ जवळजवळ 20 ते 30 वर्षापर्यंत असते.
म्युट हंस : म्युट हंस या प्रजातीमधील हा पक्षी आफ्रिकेच्या उत्तर प्रदेशांमध्ये असलेल्या पॅसिफिक रीम प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हे पक्षी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या संख्येने दिसतात. हे पक्षी 125cm ते 170cm पर्यंत असू शकतात. त्यांच्या पंखांचा आकार 200 ते 240 सेंटीमीटर लांब असतो.
निष्कर्ष
हंस हे पक्षी दिसायला अतिशय सुंदर आहेत तसेच ते शांतता प्रिय आणि सामाजिक पक्षी आहे. हंस हे पक्षी विद्येची देवता माता सरस्वती त्यांचे वाहन आहे, त्यामुळे आपण या पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे.
FAQ
हंस हे पक्षी कोठे राहतात?
हंस हे पक्षी नदी तलाव तसेच थंड हवेच्या ठिकाणी राहतात.
हंसाची मादी एका वेळेस किती अंडी देतात?
हंसाची मादी एका वेळेस तीन ते आठ अंडी देतात.
हंस हे पक्षी कोणत्या देशात आढळतात?
हंस हे पक्षी युरोप, ऑस्ट्रेलिया,अमेरिका, कॅनडा, दक्षिण युनायटेड स्टेट्स, मेस्कीको या देशांमध्ये आढळून येतात.
हंस या पक्षाचा वापर कशासाठी केला जातो?
हंस या पक्षाचा वापर मास आणि अंडी मिळवण्यासाठी केला जातो.
हंस हे पक्षी भारतात स्थायिक आहेत का?
हंस हे पक्षी भारतात स्थायिक पक्षी नाही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्थलांतरित करून भारतात येतात.